पुण्यातील नागेश कराळे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आली समोर

nagesh karale murder case big update : हत्येतील आरोपी हे चारचाकी वाहनांमधून आले होते. एकूण तीन आरोपींनी नागेश कराळे यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण पोलीस ठाणे हद्दीतील शेलपिंपळगाव येथे या तरुणाची हत्या करण्यात आली

nagesh karale murder case big update
पुण्यातील नागेश कराळे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आली समोर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आला
  • गोळीबारात नागेश कराळे यांचा जागीच मृत्यू झाला.
  • संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली

पिंपरी चिंचवड : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येत आहे. भर चौकात तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. नागेश सुभाष कराळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा खून झाल्याची माहिती आहे. सदर प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी  पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हत्ये प्रकरणी शिवकांत शिवराम गायकवाड नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप काही आरोपी सापडले नसल्याची माहिती मिळाली आहे. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश दौडकर याच्यासह इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत.

भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आला

हत्येतील आरोपी हे चारचाकी वाहनांमधून आले होते. एकूण तीन आरोपींनी नागेश कराळे यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण पोलीस ठाणे हद्दीतील शेलपिंपळगाव येथे या तरुणाची हत्या करण्यात आली असून भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

गोळीबारात नागेश कराळे यांचा जागीच मृत्यू झाला.

गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला आहे.  जुन्या वादातून ही हत्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी लावला आहे. मात्र ही हत्या कोणी केली, आणि त्यामागील कारण काय, हे अद्याप अस्पष्टच आहे. नागेश कराळे हे आपल्या वाहनात बसत असताना हे मारेकरी एका चारचाकी वाहनातून आले आणि त्यांनी नागेश कराळे यांच्यावर पिस्तूलमधून एकापाठोपाठ चार ते पाच राऊंड फायर केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी