NCP Protest : राष्ट्रवादीने आंदोलनात डमी राज्यापालांचे धोतर फेडले

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated Nov 21, 2022 | 16:52 IST

NCP Protest : शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श आहेत असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. यावरून कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. कोश्यारींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. पुण्यात राष्ट्रवादीने कोश्यारींच्या डमीचे धोतर फेडून निषेध नोंदवला आहे. 

थोडं पण कामाचं
  • शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श आहेत असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते.
  • कोश्यारींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.
  • पुण्यात राष्ट्रवादीने कोश्यारींच्या डमीचे धोतर फेडून निषेध नोंदवला आहे. 

NCP Protest : पुणे : शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श आहेत असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. यावरून कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. कोश्यारींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. पुण्यात राष्ट्रवादीने कोश्यारींच्या डमीचे धोतर फेडून निषेध नोंदवला आहे.   (nationalist congress party protest against governor bhagatsingh koshyari over chhatrapati shivaji maharaj remark)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. सोलापूरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोश्यारींच्या पुतळ्याला जोडे मारले होते. तसेच कोश्यारींचे धोतर फेडणार्‍याला आपण एक लाख ५१ हजार रुपये बक्षीस देऊ असेही जाहीर केले होते. आता राष्ट्रवादीने थेट राज्यपालांच्या धोतराला हात घातला आहे. परंतु हे खरेखुरे राज्यपाल नसून राष्ट्रवादीने कोश्यारींचा एक एक डमी आंदोलनस्थळी आणला होता.  पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक डमी राज्यपाल आणले. त्यांना राज्यपालासारखे कपडे दिले. या डमी राज्यपालांनी कोश्यारींसारखे धोतर नेसले होते. तेव्हा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या डमी राज्यपालांचे धोतर फेडले आहे.  यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोश्यारींविरोधात घोषणाबाजी केली.  


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी