लोकसभेच्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी जातीची खोटी प्रमाणपत्र सादर केली - रूपाली चाकणकर

पुणे
Updated Mar 23, 2021 | 19:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rupali chakankar targeted Navneet Rana :ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत रूपाली चाकणकर यांनी म्हटल आहे की, आपण "संसदेत जी भूमिका बजावत आहात ती खासदार की केवळ राष्ट्रवादी पक्षाच्या जिवावर आपल्याला मिळाली आहे. रूपाली

ncp leader Rupali chakankar targeted Amravati ind MP Navneet Rana
नवनीत राणा यांनी जातीची खोटी प्रमाणपत्र सादर केली  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • लोकसभेच्या निवडणुकीत आपण जातीची खोटी प्रमाणपत्रे सादर केली - रूपाली चाकणकर
  • महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, लोकसभेत खासदार नवनीत राणा यांची मागणी
  • महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटीचा तीस हजार कोटीचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आणखी एक पलटवार केला आहे. चाकणकर यांनी ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये त्यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. नवनीत राणा यांनी विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेली जातीची कागदपत्रे बनावट होती, असा असा गंभीर आरोप केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत आपण जातीची खोटी प्रमाणपत्रे सादर केली - रूपाली चाकणकर

रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, लोकसभेच्या निवडणुकीत आपण जातीची खोटी प्रमाणपत्रे सादर करून निवडणूक लढवली आणि ती जिंकली देखील, हे प्रकरण नागपूर खंडपीठात चालू असून हे सर्व जनता जाणते. आपण त्याकडे थोड लक्ष द्यावं असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?

दरम्यान, ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत रूपाली चाकणकर यांनी म्हटल आहे की, आपण "संसदेत जी भूमिका बजावत आहात ती खासदार की केवळ राष्ट्रवादी पक्षाच्या जीवावर आपल्याला मिळाली आहे. नवनीत राणा आपल्याला जर महाराष्ट्राची एवढी काळजी वाटत असेल तर, केंद्राने महाराष्ट्राच्या आकासापोटी स्वतः कडे ठेवलेला महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटीचा तीस हजार कोटीचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. असं चाकणकर यांनी म्हटले आहे."

 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, लोकसभेत खासदार नवनीत राणा यांची मागणी

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी काल लोकसभेत केली होती. यावर देखील चाकणकर यांनी टीका करत म्हटल आहे की, काल संसदेत केलेलं भाषण हे एक अभिनयाचा उत्तम नमुना होता आणि तो तुम्ही करता, मात्र तुम्हाला जर एवढा पुळका असेल तर आधी राजीनामा द्यावा नंतर राष्ट्रपती राजवटीची मागणी करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी