Sextortion Case : राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार Sextortion च्या जाळ्यात; काय आहे नेमकं प्रकरण

पुणे
भरत जाधव
Updated Feb 10, 2023 | 22:23 IST

मोहोळचे  (Mohol)आमदार यशवंत माने ( MLA Yashwant Mane)यांना सायबर भामट्याने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला.  याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber ​​Police)राजस्थानमधील ( Rajasthan) एका टोळीचा पर्दाफाश करत रिजवान खान नावाच्या आरोपीला अटक केली आहे.

NCP Mohol MLA In Sextortion's trap
राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार Sextortion च्या जाळ्यात 
थोडं पण कामाचं
  • मदार माने यांनी याची माहिती पुणे सायबर पोलिसांना दिली.
  • पुणे सायबर पोलिसांनी राजस्थानमधील एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.
  • पोलिसांनी शोध घेत आरोपी रिझवान अस्लम खान याला अटक केली आहे.

पुणे : सायबर (Cyber) भामट्यांनी थेट लोकप्रतिनिधींना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress) मोहोळचे (Mohol) आमदार यशवंत माने ( MLA Yashwant Mane) यांना सायबर भामट्याने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber ​​Police)राजस्थानमधील ( Rajasthan) एका टोळीचा पर्दाफाश करत रिजवान खान नावाच्या आरोपीला अटक केली आहे.  (NCP Mohol MLA In Sextortion's trap;Ransom demanded by making obscene video )

अधिक वाचा  :  लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?

सोलापूर मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर मिळवून त्यांच्याशी व्हाट्सअपवर संपर्क साधण्यात आला.  वेळोवेळी अश्लील संदेश पाठवले तसेच अश्लील व्हीडीओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा  प्रयत्न केला. कॉल रेकॉर्ड करून यांचे फेसबुकवर असलेले मित्र यांना पाठविण्याच्या धमकी देऊन 1 लाख रुपये इतक्या रकमेच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली. याप्रकरणी आमदार माने यांनी याची माहिती पुणे सायबर पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे. 

अधिक वाचा  : Valentine डेला असं व्यक्त करा आपलं प्रेम, नक्कीच उत्तर येईल हो

याप्रकरणी आमदार माने म्हणाले की, "मी कुठल्या ही व्यक्तीशी बोललो नाही. तसेच मला लागोपाठ 70 ते 80 मेसेज करण्यात आले होते. एक लाख रुपयांची खंडणी माझ्याकडून मागितली होती यामुळे याची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली होती," असं माने यांनी सांगितलं आहे.

आरोपींच्या राजस्थानमधून आवळल्या मुसक्या 

तक्रार आल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि राजस्थान मधील एकाला अटक केली. या गुन्ह्यातील आरोपीने वापरलेल्या मोबाइलवरून आरोपी भरतपूर राज्यस्थान येथील असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी शोध घेत आरोपी रिझवान अस्लम खान याला ताब्यात घेतलं आहे. आरोपीकडून 4 मोबाईल संच व 4 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. आरोपीच्या मोबाईल संचामध्ये स्क्रिन रेकॉर्ड केलेल्या 90 अश्लील व्हिडीओ क्लिप्स मिळाल्या आहेत. 

अधिक वाचा  : या राशींसाठी प्रॉमिस डे राहील उत्तम; तर काहींसाठी असेल आर्थिक लाभाचा दिवस

काय आहे सेक्स्टॉर्शनचं जाळं?

तरुण आणि धनाढ्य व्यक्तींना गाठून फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली जाते. या टोळीतल्या तरुणींना अश्लील बोलायला तयार केलेलं असतं. वेगवेगळ्या नंबरवरुन हा व्हिडिओ कॉल केला जातो. ओळख होताच तरुणी नग्न होऊन व्हिडिओ कॉल करते. समोरच्या व्यक्तीलाही कपडे काढायला लावले जातात. ज्याला जाळ्यात ओढायचं त्याला बोलायला भाग पाडून रेकॉर्डिंग केलं जात आणि त्यानंतर खंडणी मागण्यास सुरुवात होते.  

 नेमकं प्रकरण काय आहे? 

यशवंत माने हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. ते पुण्यातील त्यांच्या घरी असताना जानेवारी महिन्यात माने यांच्या मोबाईल नंबरवर एक अश्लील मेसेज आला आणि अश्लील व्हिडिओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी त्यांना देण्यात आली. 


 
 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी