Supriya Sule : प्रत्येकाला टीका करण्याचा हक्क, साडीच्या विधानावर सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated Nov 21, 2022 | 18:56 IST

Supriya Sule : न्युज चॅनेल मधील महिला अँकर्स साडी का नाही नेसत असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता, त्यामुळे सुळे यांच्यावर टीका होत होती. परंतु प्रत्येकाला टीका करण्याचा हक्क आहे असे उत्तर सुळे यांनी दिले आहे. तसेच माझे ३५ मिनिटांचे भाषण आहे ते ऐका असेही सुळे म्हणाल्या.

थोडं पण कामाचं
  • न्युज चॅनेल मधील महिला अँकर्स साडी का नाही नेसत असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता,
  • त्यामुळे सुळे यांच्यावर टीका होत होती.
  • परंतु प्रत्येकाला टीका करण्याचा हक्क आहे असे उत्तर सुळे यांनी दिले आहे. तसेच माझे ३५ मिनिटांचे भाषण आहे ते ऐका असेही सुळे म्हणाल्या.

Supriya Sule : पुणे : न्युज चॅनेल मधील महिला अँकर्स साडी का नाही नेसत असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता, त्यामुळे सुळे यांच्यावर टीका होत होती. परंतु प्रत्येकाला टीका करण्याचा हक्क आहे असे उत्तर सुळे यांनी दिले आहे. तसेच माझे ३५ मिनिटांचे भाषण आहे ते ऐका असेही सुळे म्हणाल्या. 

सुळे यांच्या विधानावर भाजपने टीका केली होती. 'टिकली'वर टीका करणारे 'साडी'वर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या ! अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. आज माध्यमांशी बोलतान सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझे संपूर्ण भाषण हे ३५ मिनिटांचे होते परंतु अनेकांनी फक्त १७ सेकंदाचे वक्तव्य ऐकले. काय घालावे हा प्रत्येकाचा निर्णय आहे असेही मी म्हणाले होते, ज्यांना टीका करायची आहे त्यांनी टीका करावी संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे असेही सुळे यावेळी म्हणाल्या. (ncp mp supriya sule clarification on saree comment in pune)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी