मोठी बातमी ; महिला आयोगाच्या अध्यक्षपदी 'या' आक्रमक महिला नेत्याची होणार निवड

Rupali Chakankar will be selected chairperson of the women's commission : गेल्या काही महिन्यात महिला अत्याचाराच्या व सामूहिक अत्याचाराच्या घटना पुढे आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीवर टीका होत आहे. त्यात राज्य महिला आयोगाच्या नियुक्त्यांचा मुद्दाही प्रामुख्याने पुढे आला आहे.

This woman leader will be elected as the chairperson of the women's commission
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी 'या' महिला नेत्याची होणार निवड   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पद रिक्त गेली दीड वर्ष रिक्त ठेवल्याने विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात होती
  • भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली होती
  • अन्य महामंडळावरील नियुक्त्याही लवकरच केल्या जाणार असल्याची माहिती

पुणे : आक्रमक म्हणून ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली असल्याची माहिती समोर आली आहे. रुपाली चाकणकर या सध्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष या पदाचा कारभार पाहत आहेत. चाकणकर यांच्या भाषणशैलीने त्या संपूर्ण राज्यभर ओळखल्या जातात.  त्यांची आता महाविकासआघाडी सरकारकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाल्याचे त्यांचे अत्यंत विशासू लतीफ पटेल यांनी ही माहिती दिली आहे.

पद रिक्त गेली दीड वर्ष रिक्त ठेवल्याने विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात होती

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र, राज्याच्या महिला अयोगोचा अध्यक्ष नसल्याने विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना असताना देखील महिला आयोगाचे अध्यक्ष पद हे गेली दीड वर्ष रिक्त होते. दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांना हे पद देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली होती

फडणवीस सरकारच्या काळात भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यांनी महामंडळे आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या रद्द केल्या, त्याचबरोबर महिला आयोगाचे पद देखील रिक्त करण्यात आले होते.

 

अन्य महामंडळावरील नियुक्त्याही लवकरच केल्या जाणार असल्याची माहिती

गेल्या काही महिन्यात महिला अत्याचाराच्या व सामूहिक अत्याचाराच्या घटना पुढे आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीवर टीका होत आहे. त्यात राज्य महिला आयोगाच्या नियुक्त्यांचा मुद्दाही प्रामुख्याने पुढे आला आहे. त्यामुळे चाकणकर ( Rupali Chakankar ) यांची नियुक्ती केली जाणार असून त्यावर महाविकास आघाडीत एकमत झाले आहे. दरम्यान ,  अन्य महामंडळावरील नियुक्त्याही लवकरच केल्या जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी