No water supply for most of Pune : पुणे शहरातील निम्म्या भागाचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद, तर शुक्रवारी...

No water supply for most of Pune : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी पुण्यात पाणीपुरवठा बंद राहणार पुणेकरांवर पुन्हा पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. पुण्यात येत्या गुरुवारी (4 ऑगस्टला ) काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Water supply to this part of Pune city stopped on Thursday
Pune City water Supply : पुणे शहरातील निम्म्या भागाचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • येत्या गुरुवारी पुण्यातील पाणी पुरवठा बंद
  • महापालिकेकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम
  • शुक्रवारीही कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता

Pune Water Cut : पुणेकरांवर पुन्हा पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. पुण्यात येत्या गुरुवारी (५ जानेवारीला ) काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने आणि उशीरा पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना पाण्याच्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवाठा विभागाकडून दिली आहे. (Water supply to this part of Pune city stopped on Thursday)

अधिक वाचा : Horoscope 04 January 2023 : बुधवारचा दिवस सिंह कन्यासह या राशीसाठी ठरेल फायदेशीर, पाहा तुमचे भविष्य

पुणे शहराला पाणी पुरवठा (Pune Water Supply) करणाऱ्या कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील पुणे मेट्रोच्या कामांतर्गत पाण्याची मुख्य वितरण नलिका शिफ्ट करावी लागणार असल्याने तसेच चांदणी चौक येथे प्रथमेश सोसायटी लगत कोथरुड भागाचा पाणी पुरवठा करणारी  जलवाहिनी दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे येत्या गुरुवारीवरील पंपींगच्या अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या परिसरात पाणी बंद असेल...

शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसर, सिव्हिल कोर्ट, कपोते गल्ली, सिमला ऑफिस परिसर, मोदी बाग परिसर, नगरवीर तानाजी वाडी, पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, पाटील इस्टेट या परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

अधिक वाचा : Shocking! व्हॉट्सअप ग्रुपमधून काढलं म्हणून अ‍ॅडमिनच्या पतीची कापली जीभ ...

कोथरुड भाग- शास्त्रीनगर, लोकमान्य काॅलनी उजवी, डावी भुसारी काॅलनी, वेदभवन रोडवरील भाग, डुकरखिंड, हिलव्हिव सोसायटी, वूड्स राॅयल सोसायटी, परमहंस नगर, चढावरचा भाग, लक्ष्मीनगर, राहुल टाॅवर, मुठेश्वर काॅलनी, गुरुजन सोसायटी या परिसरात देखील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी