Raj Thackeray । राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट; अटक होणार का?

न्यायलयात तारखेला हजर राहिले नसल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांना सांगलीतील शिराळा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे

Non-bailable warrant against MNS Chief Raj Thackeray
राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट; अटक होणार? 
थोडं पण कामाचं
  • न्यायलयात तारखेला हजर राहिले नसल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट
  • सांगलीतील शिराळा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.
  • सांगली जिल्ह्यात मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी जवळा आंदोलन करून दुकानांची तोडफोड केली होती.

सांगली : न्यायलयात तारखेला हजर राहिले नसल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांना सांगलीतील शिराळा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. (Non-bailable warrant against MNS Chief Raj Thackeray)

सांगली जिल्ह्यात मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी जवळा आंदोलन करून दुकानांची तोडफोड केली होती. यानंतर याबाबतचा गुन्हा शिराळा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे जिल्हाअध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासहित अन्य कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. 

या खटल्यामध्ये राज ठाकरे यापूर्वी एकदा न्यायालयात हजर देखील झाले होते. मात्र पुढील तारखांना गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने आता राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट काढल आहे. हे वॉरंट मागील महिन्यात काढण्यात आले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. राज ठाकरे यांना एका जुन्या प्रकरणात हे अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. 

कोर्टाने या प्रकरणी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना राज ठाकरे यांना सांगली कोर्टात अटक करून हजर राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. 

२००८ साली रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण न्यायालयाच्या आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती.  या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदाराना भाग पाडले. बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी