Mango on EMI : ‘पुणे तिथे काय उणे’, आता आंबेही EMI वर विकत घेता येणार

Mango sales on EMI : बोलण्याच्या ओघात 'पुणे तिथे काय उणे' असं आपण नेहमी म्हणत असलो तरी पुण्यात खरोखरच काहीच उणे नसल्याचं एका घटनेतून सिद्ध झालं आहे. पुण्यातील एका व्यापाऱ्याने चक्क EMI वर आंबा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

Now mangoes can also be bought on EMI
‘पुणे तिथे काय उणे’! आता आंबेही EMI वर विकत घेता येणार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हापूस आला बाजारात!
  • एक डझन आंब्याची किंमत 850 रुपये झाली
  • EMI वरही आंबा विकत घेता येतो.

पुणे : उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात सुंगध दरवळतो. पण पहिल्यांदा बाजार आलेल्या आंब्याचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतात. पण पुण्यातील एका आंबा व्यापाऱ्याने एक शक्कल लढवत आंबा चक्क EMI वर आंबे विकण्यास सुरुवात केली आहे. (Now mangoes can also be bought on EMI)

अधिक वाचा : Summer Vacation । 2 मेपासून उन्हाळ्याची सुट्टी, नवीन शैक्षणिक वर्ष 12 जूनपासून होणार सुरू

पुण्यातील सिंहगडरोडवरील गौरव सणस या तरुणाने आंब्याचा व्यावसाय सुरू केला आहे. त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या पिकवलेला देवगड हापूस आंबा ईएमआयवर विकला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पेटीएमशीही करार केला आहे. गौरव म्हणाले, लोक ईएमआयवर मोबाईल खरेदी करतात. EMI मुळे लोक महागड्या वस्तू सहज खरेदी करू शकतात. अशाप्रकारे माझ्या मनात कल्पना आली की EMI वरही आंबा विकत घेता येतो. त्यांनी सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीने पाच हजार रुपयांचा आंबा खरेदी केला तर त्याला आठ महिने किंवा बारा महिन्यांच्या ईएमआयवर पैसे भरण्याची सुविधा मिळेल.

अधिक वाचा : MHADA Konkan Lottery 2023: म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ, जाणून घ्या काय आहे शेवटची तारीख

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या होत्या. देवगड, रत्नागिरी, राजापूर, वेंगुर्ला, मालवण,या भागातून हापूस आंब्याच्या पेट्यांची संख्या यामध्ये मोठी आहे. आवक वाढल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा हापूसचे दर कमी झाले आहेत. गेल्या वर्षी मान्सून आणि फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत तीव्र उष्णतेचा समावेश होता. त्यामुळे यावर्षी आंब्याचे पीक चांगले झाले. अवकाळीचा फटका कोकणाला जास्त प्रमाणात बसला नाही. एका पेटीत प्रत्येकी दोन ते चार डझन हापूस आंबे आहेत. प्रत्येक पेटीचा आकार हा त्यामधील आंब्याचा दर्जा आणि आकारानुसार बदलतो. 850 ते 2,200 रुपये प्रती डझन असा या आंब्याचा दर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी