खासदार नवनीत राणा या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी आहेत का? रुपाली चाकणकर यांचा सवाल

पुणे
अजहर शेख
Updated Mar 26, 2021 | 15:32 IST

officer dipali sucide case : महिला लोकप्रतिनिधी म्हणून दीपाली चव्हाण यांनी तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार नवनीत राणा या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी आहेत का? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. 

officer dipali sucide case
खासदार नवनीत राणा या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी आहेत का? 

थोडं पण कामाचं

  • नवनीत राण मॅडम यांनाही ती रेकॉर्डिग ऐकवली - दिपाली चव्हाण 
  • दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या
  • माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक आहेत - दीपाली चव्हाण

पुणे : लोकसभेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (mp navaneet rana) कौर यांच्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी निशाणा साधला आहे. अमरावतीतील मेळघाट (amaravati melaghat) व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्म्हहत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नवनीत राणा यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, सदर माहिती जेव्हा दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा यांच्या कानावर घातली तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो. असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. दरम्यान, त्यांनी महिला लोकप्रतिनिधी म्हणून दीपाली चव्हाण यांनी तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार नवनीत राणा या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी आहेत का? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

नवनीत राण मॅडम यांनाही ती रेकॉर्डिग ऐकवली - दीपाली चव्हाण 

दरम्यान पुढे दीपाली चव्हाण यांनी लिहिले आहे की, 'जेव्हा गावकरी माझ्यावर अॅट्रोसिटी दाखल करणार होते, ते मी त्यांना कळवले त्यावेळी मै खुद SP को बोलके तुमपर अॅट्रोसिटी लगाता हु असे म्हणाले. याबाबत माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे. या आधी खासदार नवनीत राणा यांनाही ती रेकॉर्डिग ऐकवली आहे.(दीपाली चव्हाण यांनी या सुसाईड नोटमध्ये नवनीत राणा यांचा फक्त एवढाच उल्लेख केला आहे) अॅट्रोसिटीत बेल न झाल्याने मी सुट्टीवर गेले. त्यानंतर कोर्टाच्या निकालाबद्दल मी कळवले होते. पण शीवकुमार यांनी मला रुजू करुन घेण्यास नकार दिला. तसेच माझ्या रजा कालावधीतील सुट्टी नाकारण्याची शिफारस केली. त्यावेळी आपण देखील माझी सुट्टी नाकारली. मला पगार दिला नाही'. असा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक आहेत

'माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की, माझे रोखलेले वेतन तात्काळ द्यावे. माझ्या मृत्यूनंतरचे आर्थिक लाभ सर्व माझ्या आईला द्यावे. विनोद शिवकुमारबाबत तुमच्याकडे खूप तक्रारी येतात. कधी तरी त्यांना गांभीर्याने घ्या. कारण त्या व्यक्तीमुळे तुमचेही नाव खराब होत आहे. त्यांचे अधिकाऱ्यांसोबतचे वागणे खराब आहे. ते खूप घाण घाण शिव्या देतात. फिल्डवर फार त्रास देतात. ते माझ्याशी फार खराब बोलतात. त्याचा मला मानसिक त्रास होतो. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक आहेत'.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी