Old woman murder in Pune : सीआयडी मालिका पाहून अल्पवयीन मुलांनी केली वृद्ध महिलेची हत्या , सोबतच 'हेही' केलं कृत्य

पुणे
Updated Nov 03, 2021 | 19:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Older woman murdered by minors after watching CID series : पुण्यात काही दिवसांपूर्वी एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची घटना समोर आली होती. सदर महिला पुणे येथील सिंहगड रोड परिसरातील हिंगणे येथील एका सोसायटीत एकटी राहत होती.

Older woman murdered by minors after watching CID series
सीआयडी मालिका पाहून अल्पवयीन मुलांनी केली वृद्ध महिलेची हत्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आरोपींनी दोन महिन्यांपूर्वी महिलेच्या घरात चोरी करण्याची योजना आखली होती.
  • आरोपींनी महिलेच्या घराची खोटी चावी देखील बनवून घेतली होती
  • पुरावा हाती नसताना सिंहगड पोलिसांनी कसून तपास करत हत्येचा उलगडा केला

Older woman murdered by minors after watching CID series पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची घटना समोर आली होती. सदर महिला पुणे येथील सिंहगड रोड परिसरातील हिंगणे येथील एका सोसायटीत एकटी राहत होती. या महिलेची हत्या वजनदार वस्तूने डोक्यात वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. सदर हत्येच्या घटनेचा तपास लावणे हे पोलिसांसाठी मोठ अवघड काम होत मात्र, पोलिसांनी अवघ्या चार दिवसांतचं  हत्येचं गूढ उलगडलं आहे. दरम्यान, हत्या करून मारेकऱ्यांनी तसेच घरातील रोकड आणि दागिने देखील चोरी केले होते.

आरोपींनी दोन महिन्यांपूर्वी महिलेच्या घरात चोरी करण्याची योजना आखली होती.

याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी १४ आणि १६ वर्षीय दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरलेली रोकड आणि दागिने जप्त केली आहेत. मृत महिला दागिने आणि पैसे कुठे ठेवते, हे आरोपींना माहीत होतं. यातूनच आरोपींनी दोन महिन्यांपूर्वी महिलेच्या घरात चोरी करण्याची योजना आखली होती. त्याचबरोबर संबंधित अल्पवयीन आरोपींनी सीआयडी मालिका पाहून चोरी आणि हत्या करण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आरोपींनी महिलेच्या घराची खोटी चावी देखील बनवून घेतली होती

मृत महिला वयस्कर असल्याने ती घरातून बाहेर जात नव्हती हे देखील या आरोपींना माहिती होती. पण त्यामुळे आरोपींनी चोरीचा आणि हत्याचा कट रचला. आरोपीनी हत्येचा कट रचताना मयत महिलेच्या घराची खोटी चावी देखील बनवून घेतली होती. त्यामुळे, दोन्ही आरोपींनी ७० वर्षीय मृत शालिनी सोनवणे यांच्या घरात प्रवेश केला. दोन्ही मुलं मृत महिलेच्या ओळखीची असल्याने ते तिघंही घरात टीव्ही पाहत बसले. दरम्यान आरोपींनी अचानक वृद्ध महिलेला अचानक ढकलून दिलं. नाक आणि तोंड दाबून तिची निर्घृण हत्या केली.

 

पुरावा हाती नसताना सिंहगड पोलिसांनी कसून तपास करत हत्येचा उलगडा केला

सदर घटनेचा तपास करताना पोलिसांसमोर अवघड काम होत. कारण कुठल्याही प्रकारचा पुरावा आरोपींनी मागे सोडला नव्हता. मात्र, पुरावा हाती नसताना सिंहगड पोलिसांनी कसून तपास करत हत्येचा उलगडा केला. आरोपींनी कपाटातील ९३  हजार रुपयांची रोख रक्कम आणि ६७ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरुन नेले. हाताचे ठसे उमटू नये म्हणून आरोपींनी हातात हातमोजे घातल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. मात्र, पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी