Pune Mhada Lottery : पुणेकर व्हायचंय? जरूर व्हा! पण म्हाडाचं घर हवं असेल तर आधी ऑनलाईन नोंदणी करा!

तुम्हाला पुणे, सोलापूर किंवा कोल्हापूर परिसरात घर घ्यायचं असेल, तर तशी संधी चालून आली आहे. म्हाडाकडून पुणे महानगर विभागासाठीच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली असून त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

Pune Mhada Lottery
पुणे परिसरासाठी म्हाडाच्या घरांची सोडत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पुण्यात म्हाडाकडून 5068 घरांसाठी लॉटरी
  • पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात घरं
  • सोडतीत सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक

Pune Mhada Lottery | आपण काम करत असलेल्या शहरात आपलं हक्काचं घर असावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र बाजारातील सध्याच्या दरानं घरं घेणं प्रत्येकालाच परवडत नाही. त्यासाठी म्हाडाच्या (MHADA) घरांची लॉटरी (Lottery) कशी जाहीर होते, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष असतं. पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

5 हजार 68 सदनिका

म्हाडाकडून पुणे शहर आणि परिसरातील एकूण 5 हजार 68 जागांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे. पुणे, कोल्हापूर आणि परिसरात असणाऱ्या या सदनिकांच्या सोडतीत ज्यांना सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी कऱणे गरजेचं असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली आहे. 

पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी

घरांची विभागणी

या सोडतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण सदनिकांपैकी 278 सदनिका या म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनांमधून शिल्लक राहिलेल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्के कोट्यातून उपलब्ध झालेल्या 2 हजार 845 सदनिका आहेत. याशिवाय म्हाडाच्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 1 हजार 945 सदनिका आहेत. 

जाणून घ्या उत्पन्न मर्यादेच्या अटी

म्हाडाने या वर्षीपासून उत्पन्न मर्यादेत बदल केले आहेत. केवळ पुण्यातच नव्हे, तर मुंबई महानगर क्षेत्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासह 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या सर्व शहरांमध्ये हे निकष बदलण्यात आले आहेत. नव्या निकषांनुसार उत्पन्न गटांची आखणी करण्यात आली आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठीची मर्यादा वार्षिक 6 लाख रुपये असणार आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी 6 ते 9 लाख रुपये, उच्च गटासाठी 12 ते 18 लाख रुपये प्रतिवर्ष अशी मर्यादा निश्चित कऱण्यात आली आहे. 

अधिक वाचा - पहिल्याच पावसात लोकलमुळे मुंबईकरांची तारांबळ, संगमनेरमध्ये घर कोसळल्याने तिघांचा मृत्यू

नोंदणीला सुरुवात 

गुरुवारपासून म्हाडाच्या लॉटरीसाठीच्या ऑनलाईन नोंदणीला सुुरुवात झाली आहे. पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 5 हजार 68 सदनिकांसाठी अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ‘गो-लाईव्ह’ या कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. या लॉटरीसाठी जे अर्ज प्राप्त होतील, त्याची सोडत 29 जुलै या दिवशी काढण्यात येणार आहे.  गुरुवार, 5 जुलैपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून 9 जुलैपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर 10 जूनपासून अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकतील. 12 जुलैपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS किंवा NEFT मार्फत अनामत रक्कम भरता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 21 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता म्हाडाच्या वेबसाईटवरून जाहीर केली जाणार आहे. 

अधिक वाचा- या पॅटर्नने मतदान करा, तिन्ही उमेदवार निवडणून येतील', हाॅटेल ताजमध्ये देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना दिले धडे

अर्जदारांनी फसू नये

या सोडत प्रक्रियेचा गैरफायदा घेऊन अनेकजण एजंट किंवा म्हाडाचे प्रतिनिधी असल्याचं सांगून सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारांपासून सावध राहण्याचं आवाहन म्हाडातर्फे कऱण्यात आलं आहे. सदनिकांच्या वितऱणासाठी म्हाडाकडून कुणालाही प्रतिनिधी, सल्लागार किंवा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमण्यात आलेलं नाही.अर्जदारानं अशा कुठल्याही व्यक्तीसोबत परस्पर व्यवहार करू नये. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून इतर कुठल्याही मार्गाने म्हाडाच्या सोडतीत सहभागी होता येणार नसल्याचं म्हाडाकडून स्पष्ट कऱण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी