'या' कारणामुळे पुण्याच्या बुधवार पेठेतील ९९ टक्के महिला वेश्या व्यवसायातून बाहेर पडणार!

पुणे
Updated Sep 16, 2020 | 12:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Over 99% Sex Workers In Pune Look For Alternative Livelihood: कोरोना काळात  रेड लाईट एरियात कोणताही पुरुष भीतीने फिरकत नसल्याने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट ओढावलं आहे.

Over 99% Sex Workers In Pune Look For Alternative Livelihood
पुण्याच्या बुधवार पेठेतील ९९ टक्के महिला वेश्या व्यवसायातून बाहेर पडणार !   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • ९९  टक्के महिला रोजीरोटीसाठी दुसऱ्या पर्यायाच्या शोधात 
  • ८५ टक्के महिला कर्जबाजारी झाल्या आहेत.
  • पुण्यातील बुधावर पेठ देशातील तिसरा सर्वात मोठा रेड लाईट एरिया

पुणे: देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोनाचा (corona virus) संसर्ग कमी करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन (lockdown) करण्यात आले होते. दरम्यान घालून दिलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांना आपली नौकरी देखील गमवावी लागली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक घटकांचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान वेश्या व्यवसाय करून, आपल्या जीवनाचा गाडा हाकणाऱ्या महिलांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात एकही ग्राहक फिरकत नसल्याने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. लॉकडाऊन मध्ये सध्या शिथिलता करण्यात आली असून, शिथिलता आणण्यात आल्यानंतर आता वेश्या व्यवसायाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र पुण्यातील बुधवार पेठ (budhwar peth pune) येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांबाबत (sex worker) एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे.

९९  टक्के महिला रोजीरोटीसाठी दुसऱ्या पर्यायाच्या शोधात 

आशा केअर ट्रस्टने केलेल्या सर्वेक्षणातून मोठी माहिती उघड झाली आहे कि, पुणे येथील बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या तब्बल ९९ टक्के महिला आपल्या पोटाची भूख भागवण्यासाठी दुसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत. कोरोना हा आजार एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो. त्यामुळे कोरोना काळात  रेड लाईट एरियात कोणताही पुरुष भीतीने फिरकत नसल्याने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट ओढावलं असून, त्यांनी वेश्या व्यवसाय सोडून दुसरा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला आहे.

८५ टक्के महिला कर्जबाजारी झाल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही पुरुष रेड लाईट एरियात फिरकत नसल्याने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला मोठ्या आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत. दरम्यान यातून अनेक महिला कार्जाबाजारी देखील झाल्या आहेत. दरम्यान ८५ टक्के महिलांनी कर्ज घेतले आहे. यातील ९८ टक्के महिलांनी तर वेश्यालयाच्या मालकांकडून कर्ज घेतले आहे. तर काही महिलांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. दरम्यान सदर महिलांवर कर्जाचे डोंगर वाढत चालले आहे.

पुण्यातील बुधावर पेठ देशातील तिसरा सर्वात मोठा रेड लाईट एरिया

दरम्यान पुण्यातील बुधवार पेठ हा देशातील तिसरा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. या बुधवार पेठेत अनेक वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला राहतात. त्यांची एकूण ७०० घरे आहेत त्याचबरोबर ३ हजार सेक्स वर्कर्स काम करतात. आशा केअर ट्रस्टने सदर केलेला सर्वे हा ३०० महिलांना भेटून केला आहे. ज्यामध्ये सदर परस्थिती समोर आली आहे. शिक्षण नसल्याने उदरनिर्वाहासाठी दुसरीकडे कुठे काम मिळू शकत नाही, 87 टक्के महिलांच्या मते लॉकडाऊनच्या आधीही आम्हाला या व्यवसायातून जे पैसे मिळत होते, त्यातून आम्ही आमच्या व आमच्या कुटुंबाच्या मुलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाही. अस म्हंटल आहे.

पीडित महिलांना मदत निधी द्यावा

आशा केअर ट्रस्टच्या अध्यक्षा शीला शेट्टी यांनी म्हंटल आहे कि, आमचे सर्वेक्षण असे सुचविते की बुधवार पेठ भागातील बहुतेक सर्व महिला रोजीरोटीचे पर्यायी स्त्रोत पाहात आहेत. वेश्याव्यवसायाची निवड न करणार्‍या महिलांना कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन आयुष्य सुरू करण्यास मदत करण्यासाठी तस्करीग्रस्त पीडित महिलांना मदत निधी द्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी