राज्याचा जीएसटीचा पैसा आला तर इंधन दर कपात; ईडी अन् दादांच्या अनुपस्थितीवर शरद पवारांचा डिफेन्स गेम

पुणे
भरत जाधव
Updated Nov 05, 2021 | 13:14 IST

Pawar Family Diwali : बारामती (Baramati )येथे दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब (Pawar family) एकत्र आले. या कार्यक्रमाप्रसंगी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 Sharad Pawar's defense game in the absence of Ajit Dada ED Raid
पत्रकारांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा डिफेन्स गेम  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • अजित पवारांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे अजित पवारांना दिवाळी कार्यक्रमात बोलवलं नाही.
  • एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरू नये.
  • जीएसटीचा पैसा आला तर इंधन दर कपात शक्य

Pawar Family Diwali : मुंबई : बारामती (Baramati )येथे दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब (Pawar family) एकत्र आले. या कार्यक्रमाप्रसंगी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी नेहमी प्रमाणे डिफेन्स गेम खेळत वेळ मारून नेली. इंधन दर कपात (fuel rate drop), ईडीच्या कारवाया, बस कर्मचाऱ्यांचा संप (Bus staff strike), अजित पवार यांची कार्यक्रमातील अनुपस्थितीवर प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आली. 
केंद्राने पैसे दिले तर इंधनाच्या दरात कपात 

केंद्रापाठोपाठ भाजपशासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्यावर महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. काही राज्यातींल लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा दणका बसला. त्यामुळेच इंधन दर कमी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

महाराष्ट्रातील जनतेलाही इंधन दरात सवलत मिळावी अशी मागणी केली जात आहे. याविषयी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. “राज्य सरकारने निश्चित दिलासा देऊ असे म्हटले आहे. पण केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणं आहे ते लवकर द्यावे म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल,” असे शरद पवार म्हणाले. आधी केंद्राने जीएसटीचे पैसे दिले तरच यात कपात होईल असं सुचक वक्तव्य पवारांनी केलं.  

काही दिवसांपूर्वी जीएसटी काउंसिलची बैठक झाली होती. या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री आणि उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी पेट्रोल- डीझेल जीएसटीमध्ये आणण्यात यावा का असा प्रश्न या काउंसिलमध्ये चर्चेस घेण्यात आला. परतु अजित पवारांसह अन्य राज्यांच्या मंत्र्यांनीही या प्रश्नाला नाही असं उत्तर दिलं होतं. अजित पवार यांनी विरोध केल्यामुळे राज्यात विरोधी पक्षात असलेले भाजपने सरकारला कोंडीत पकडलं होतं.  

प्रवाशांना वेठीस धरू नका कर्मचाऱ्यांना सल्ला, पण सरकारची पाठराखण   

एसटी संघटनेतील व्यक्ती मला भेटले होते. त्यांनी हा संप पुढे न्यायचा नाही हे सांगितले होते. दिवाळीच्या काळात नागरिकांना त्रास देणे योग्य नाही अशी आमची भूमिका आहे. काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली आहे म्हणून हे घडत आहे. ८० ते ८५ टक्के एसटी रस्त्यावर धावत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना माझे आवाहन आहे की संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी हे योग्य होणार नाही. कोर्टाने सुद्धा हा संप कायदेशीर नाही अशा प्रकारच्या निष्कर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोर्टाचा आदर ठेवावा आणि हा विषय संपवावा,” असे शरद पवार यांनी म्हटले आहेत. 

परंतु ज्या महाविकास आघाडीमध्ये शरद पवार हे महत्त्वाच्या ठिकाणी आहेत. किंबहुना स्वत: मुख्यमंत्री म्हणतात, शरद पवार हे राज्य चालवतात किंवा सरकार मार्गदर्शन करतात. तर पवारांनी काही तरी ठोस निर्णय देत संपाचा निकाल लावला पाहिजे होता. जवळपास 59 आगाराचे कामकाज ठप्प आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीला २३ पैकी २२ कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तर राज्यभरात जवळपास  २८ एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

अजित दादांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता का उगीच चर्चा नको

दिवाळीच्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. शरद पवार यांच्या बारामती येथील माळेगाव येथील आप्पासाहेब पवार सभागृहात दिवाळी भेट कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी झुंबड उडाली होती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमास उपस्थित नव्हते.अजित पवारांना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने आज त्यांची चाचणी घेण्यात आली आहे. अजित पवारांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना रिस्क नको म्हणून यायला नाही सांगितलं आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

 “संपूर्ण विश्वावर कोरोनाचे संकट आले त्यामुळे प्रत्येकाला काही पथ्ये पाळावी लागत आहेत. करोनाचे संकट कमी होत आहे. राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतल्याने करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. लोकांकडून मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगसारखे कोरोनाचे नियम पाळण्याची तयारी असल्याचे सरकारला सांगितले,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

हे असू शकतं कारण -

परंतु दोन दिवशी पूर्वी आयकर विभागाने अजित पवार यांच्या संबंधित १००० कोटीची संपत्ती जप्त केल्याचं वृत्त माध्यमांमध्ये झळकवले होते. याविषयी अधिक स्पष्टीकरण द्यावे लागू नये म्हणून कदाचित अजित दादांना दिवाळी फराळपासून दूर ठेवलं असावं. दरम्यान अजित पवार यांनी दुसऱ्या दिवशी ही कारवाई आपल्या संपत्तीवर झाली नसल्याचं म्हटलं होतं.

ईडी, आयकराच्या चौकशीवर शरद पवार यांचं सूचक मौन

गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांशी संबंधितांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी सूचक मौन पाळलं. अरे काही तरी चांगलं बोला, असं म्हणून शरद पवार यांनी हा विषय टाळला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी