PM Modi will Visit Dehu Pune on 14 June 2022 : देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार १४ जून २०२२ रोजी संत तुकाराम महाराज यांच्या निवासस्थानाला भेट देणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राजधानी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देहू भेटीचे निमंत्रण दिले होते. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २० जूनला देहूतून पंढरपूरकडे जाणार आहे. याआधी १४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येणार आहेत.
संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने देऊळवाड्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे. हे काम ५ जून २०२२ पर्यंत पूर्ण होईल. देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. हे पाषाणातील मंदिर आहे. मंदिरावर आकर्षक नक्षीकाम केले आहे. शिळा मंदिरावर दोन सोन्याचे कळस आणि इतर ३४ लहान कळस आहेत. शिळा मंदिरातील संत तुकाराम महाराजांची मूर्ती ४२ इंचांची आहे. ही मूर्ती अतिशय विलोभनीय आहे.
देहू येथे पंतप्रधान येत असल्यामुळे संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीच्यावतीने जय्यत तयारी सुरू आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय सातत्याने सुरक्षेचा आढावा घेत आहे.