PM Modi: 2022 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प, मोदींकडून परळीकरांसाठी भरघोस योजना

पुणे
पूजा विचारे
Updated Oct 17, 2019 | 13:25 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात तीन सभा होत आहेत. त्यापैकी पहिली सभा ही परळीत पार पडली. यावेळी त्यांनी परळीकरांकडून बऱ्याच योजनांची घोषणा केली.

PM Modi
2022 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्पः मोदी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात तीन सभा होत आहेत.
 • विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलं आहे.
 • मोदींची आजची पहिली सभा परळीमध्ये पार पडली.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात तीन सभा होत आहेत. त्यापैकी पहिली सभा ही परळीत पार पडली. या सभेत मोदींनी बीडकरांसाठी अनेक योजनांची घोषणा केली. येत्या 5 वर्षांत प्रत्येक घरात पाणी पोहोचवणार असल्याचं म्हणतं मोदींनी  5 वर्षांत केलेल्या कामांचा पाढा वाचला आणि गरिबांना पक्कं घर, वीज, शौचालय सरकारनं दिल्याचं म्हटलं. प्रत्येकाला शुद्ध पाणी देणार असून 3.5 लाख कोटी पाणी योजनेवर खर्च करू असं म्हणत जगात पाण्यासाठी एवढा निधी कुणीही दिला नसल्याचं मोदींनी म्हटलं. या सभेत मोदींनी विरोधकांवरही टीका केली आहे.  काँग्रेस- राष्ट्रवादी स्वार्थी आहेत.काँग्रेसचे नेते गटबाजी करत भांडतात. देशाच्या एकतेत यांना हिंदू मुस्लिम दिसतं. देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवा, असं मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा लाईव्ह

 1. सर्व महिलांनी घराबाहेर पडून मतदानाचा सहभागी व्हावं.सुट्टीचा बेत करू नका. मतदान करा.  महायुतीला रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करा- 
 2. जशी दिवाळी साजरी करता त्याच उत्साहात मतदान करा, मोदींचं मतदारांना आवाहन. 
 3. नरेंद्र मोदींकडून पंकजा मुंडेंचं कौतुक.
 4. 25 हजार कोटींचं मराठवाड्यात रस्ते. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी महामंडळ.वॉटरग्रीडसाठी बीडमध्ये हजारो कोटींचा निधी देणार 
 5. जगात पाण्यासाठी एवढा निधी कुणीही दिला नाही. कलम 370 वरून मोदींचं मतदारांना आवाहन.
 6. जलजीवन मिशनमध्ये साडेतीन लाख कोटी खर्च करणार. पीकविमा योजनेतून अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात. अल्पउत्पन्न घटकातील नागरिकांना पेन्शन मिळणार. दलालांची साखळी नष्ट करण्याचं काम सरकारनं केलं.
 7. दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील. 2022 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प.गेल्या 5 वर्षांत राज्य सरकारकडून जलसंकटावर मोठं काम. 
 8. प्रत्येकाला शुद्ध पाणी देणार. जगात पाण्यासाठी एवढा निधी कुणीही दिला नाही. 3.5 लाख कोटी पाणी योजनेवर खर्च करू
 9. येत्या 5 वर्षांत प्रत्येक घरात पाणी पोहोचवणार. 5 वर्षांत केलेल्या कामांचा नरेंद्र मोदींकडून पाढा. गरिबांना पक्कं घर, वीज, शौचालय सरकारनं दिलं.
 10. देशाच्या एकतेत यांना हिंदू मुस्लिम दिसतं. देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवा. कलम 370 वरून सरकारची खिल्ली उडवणाऱ्यांची इतिहासात नोंद होईल. 370 कलम हटवल्यानं टीका करणाऱ्या विरोधकांचा मोदींकडून समाचार
 11. दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात आजही मोदींकडून पुन्हा कलम 370 चा नारा.370 राजनीतीमुळे नाही तर देशनीतीमुळे हटवलं. कलम 370 हटवल्यानं महिला, दलितांना न्याय मिळाला. 
 12. काँग्रेस- राष्ट्रवादी स्वार्थी आहेत.विरोधकांकडून दरवेळी सरकारी योजनांची खिल्ली, काँग्रेसचे नेते गटबाजी करत भांडतात.
 13. महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी, या निवडणुकीत पुन्हा ऐतिहासिक विजय. ५ वर्षांत केलेल्या कामानं लोकं भाजपसोबत
 14. पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना टोला, मोदींची विरोधकांवर सडकून टीका, एकीकडे कार्यशक्ती, दुसरीकडे स्वार्थभक्ती-मोदी
 15. मुंडे, महाजनांसारखे मित्र तुम्ही दिले. भाजप राजनीती नाही तर देशनीती करत आहे.
 16. तुमचे नेते तुम्हाला सोडून का जात आहेत, आता संधी आहे, विरोधकांना धडा शिकवा- मोदी.
 17. विरोधक हताश आणि निराश आहेत- मोदी
 18. भाजपचे कार्यकर्ते समाजासाठी कार्य करतो
 19. बीड जिल्ह्यानं नेहमीच भाजपला साथ दिली
 20. मराठवाडा ही संतांची भूमी- मोदी
 21. यंदाच्या निवडणुकीत सर्व विक्रम मोडतील असं वाटतंय- मोदी, जनसागर पाहता यंदा बीडमध्ये विजयाचे सर्व रेकॉर्ड मोडणार
 22. बीडच्या जनतेनं नेहमीच भाजपला भरघोस मतदान केलंय
 23. बीडनं भाजपला कर्मठ, समर्पित कार्यकर्ते दिले-मोदी
 24. एकाच वेळी दोन देवांच्या दर्शनाचं भाग्य
 25. आधी वैजनाथ आणि नंतर जनता जनार्दनचं दर्शन
 26. माझे मित्र गोपीनाथ मुंडेंच्या कर्मभूमीत आलोय- मोदी
 27. पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरूवात
 28. पंतप्रधान मोदी येथे आले हे परळीकरांचं भाग्य- पंकजा मुंडे
 29. मोदींनी २८०० कोटी रूपये रेल्वेसाठी दिला- पंकजा मुंडे
 30. जम्मू काश्मीरमधल्या सैनिकांचा फोन आला आणि म्हणाला मोदींना कलम 370 साठी धन्यवाद द्या- पंकजा मुंडे
 31. जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार सभेला उपस्थित
 32. परळीत सभास्थळी, मोदी, मोदीच्या घोषणा
 33. मोदी पहिल्यांदा परळीत 
 34. वैजनाथाची मूर्ती देऊन मोदींचं स्वागत
 35. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शन घेण्यासाठी वैजनाथाच्या मंदिरात
 36. पंतप्रधान नरेंद्र मोदींची परळीत सभा
 37. थोड्याच वेळात मोदींची सभा सुरू होणार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी