पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सभांचा धडाका सुरु केलं आहे. आज (गुरुवार) त्यांनी राज्यात तीन सभा घेतल्या. त्यातील तिसरी आणि शेवटची सभा त्यांनी पुण्यात घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातही कलम ३७०चाच राग आळवला. 'कलम ३७० हटविण्याच निर्णय फार सोपा नव्हता. त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.' असंही मोदी यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी असाही दावा केला की, 'देशात काही जण तरुणांना घाबरविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरुणांनी घाबरण्याचं कारण नाही. कारण देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. तसंच येत्या काही वर्षात आणखी आर्थिक गुंतवणूक होणार आहे.' असं मोदी पुण्यातील भाषणात म्हणाले.