PM Modi Satara: महायुतीच्या सरकारनं अनेक योजना मार्गाी लावल्याः पंतप्रधान मोदी

पुणे
पूजा विचारे
Updated Oct 17, 2019 | 16:49 IST

थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यात सभा पार पडली. आज सकाळी मोदींनी परळीत प्रचारसभा घेतली. साताऱ्याच्या सभेत मोदींनी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारवर टीका केली आहे.

pm modi in satara
PM Modi LIVE: पंतप्रधान मोदींची साताऱ्यात सभा  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • पंतप्रधान नरेंद्र मोदींची साताऱ्यात सभा पार पडली.
 • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोदी आज महाराष्ट्रात आहेत.
 • परळी आणि साताऱ्यातली सभा पार, तिसरी सभा पुण्यात

आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत. आज दिवसभरात मोदींच्या तीन सभा पार पडणार आहेत. पहिली सभा परळी विधानसभा मतदारसंघात पार पडली. आजच्या दिवसातील मोदींची दुसरी सभा साताऱ्यात पार पडली. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारवर टीका केली आहे.  विकासाच्या नावानं आघाडी सरकारनं केवळं राजकारण केलं. जे आपआपसात भांडतायत ते सत्ता कशी चालवणार? असा सवाल उपस्थितीत करत  काँग्रेस- राष्ट्रवादी फोडाफोडीचं राजकारण करतात असं मोदींनी म्हटलं आहे.

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यातून लाईव्ह

 1. जास्तीत जास्त मताधिक्यानं दोन्ही राजेंना विजयाची माळ घाला
 2. शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करा
 3. मोदींकडून मतदान करण्याचं आवाहन 
 4. सर्वात चांगली फुले असावी ती कास पठारातील, सर्वांत चांगला धबधबा असावा तो वैजापूरचा- मोदींचं मराठीतून वक्तव्य
 5. योजना असो, आरक्षण असो आम्ही करून दाखवलं. मराठा आरक्षणावर आम्ही काम केलं. महायुतीच्या सरकारमध्ये महिला सक्षणीकरण केलं
 6. सिंचन, शेतकऱ्यांसाठीच्या योजना युती सरकारनं राबवल्या.
 7. 2014 ला महायुतीचं सरकार आल्यानंतर सर्व योजना मार्गी लागल्या. महायुतीच्या सरकारनं मंजूर केलेल्या योजना आघाडीनं रखडवल्या
 8. विकासाच्या नावानं आघाडी सरकारनं केवळं राजकारण केलं
 9. जे आपआपसात भांडतायत ते सत्ता कशी चालवणार? काँग्रेस- राष्ट्रवादी फोडाफोडीचं राजकारण करतात
 10. उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी सर्वांनी पळ काढला, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीतच बिघाडी. 
 11. महाराष्ट्र असो किंवा हरियाणा भाजपचं जिंकणार- मोदी
 12. काँग्रेस आणि एनसीपीचे नेते जनभावनांना समजू शकत नाही. या निवडणुकीत त्यांची हालत आणखीन खराब आहे
 13. साताऱ्यातील अपसिंगा गाव राष्ट्रभक्तीला समर्पित
 14. गेल्या ५ वर्षांत भारतीय संरक्षण विभागाचं सामर्थ्य वाढवलं. देशाची सुरक्षा आणि राष्ट्रवाद जपण्यात प्राथमिकता.
 15. भारतावर वाकडी नजर ठेवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाणार
 16. गेल्या ५ वर्षांपासून महायुतीच्या सरकारनं केंद्रात आणि राज्यात पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न केला
 17. शिवाजी महाराजांच्या संस्कारासोबत आमच्यासोबत त्यांचं कुटुंब देखील आहे- मोदी
 18. सातारा दौरा म्हणजे जणू तीर्थयात्रेला आल्यासारखं वाटतं- मोदी
 19. सातारा संतांची भूमी आहे. सातारा माझ्यासाठी एक गुरू भूमी आहे. 
 20. शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, सावित्रीबाईंना अभिवादन
 21. उदयनराजेंना ऐकावसं वाटतं होतं- पंतप्रधान मोदी
 22. आई तुळजाभवनी, छत्रपती शिवाजी महाराजांना माझा साष्टांग दंडवत, मोदींच्या भाषणाला मराठीतून सुरूवात
 23. मोदी मोदीच्या घोषणा, मोदींच्या भाषणाला सुरूवात
 24. माझ्या बारशाला जे उपस्थित होते तेच आज माझ्या विरोधात उभे आहेत- उदयनराजे
 25. लोकांच्या आग्रहाखातर राजीनामा दिला, लोकांनी सांगितलं मोदींनी चांगले निर्णय घेतलेत
 26. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं केवळ घोषणा दिल्या बाकी काही केलं नाही.  त्यांनी फक्त घोटाळा आणि भ्रष्टाचार केला- उदयनराजेंची आघाडीवर सडकून टीका
 27. मराठा आरक्षणाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं. महायुतीमुळेच मराठा आरक्षण मार्गी लागलं.
 28. काँग्रेसच्या काळात फक्त मूठभर लोकांकडे सत्ता, काँग्रेसनं फक्त राजकारण केलं, समाजकारण नाही, सत्तेमुळे काँग्रेसमध्ये अहंकार होता.
 29. मोदींच्या दूरदृष्टीमुळे सर्वत्र विकास घडतोय. सातारा ही चळवळीची भूमी आहे- उदयनराजे
 30. 'आर्यन मॅन' म्हणून मोदींचा उल्लेख- उदयनराजे
 31. मोदींनी गाळातून कमळ फुलवलं- उदयनराजे
 32. काँग्रेस सरकारनं फक्त घोषणा देण्याचं काम केलं- उदयनराजे
 33. 370 कमळाचा हार घालून शिवेंद्रराजेंकडून मोदींचं स्वागत
 34. चांदीचं कमळ देऊन मोदींचं स्वागत, उदयनराजेंकडून मोदींचं शाही स्वागत, पगडी आणि तलवार, राजमुद्रा देऊन स्वागत
 35. पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात दाखल
 36. साताऱ्यात मोदींचं स्वागत शाही पद्धतीनं होणार
 37. साताऱ्यात येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाचवे पंतप्रधान
 38. राजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी साताऱ्यात
 39. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सुरू होणार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी