शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात

Sharad Pawar's convoy meets with an accident राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात एका पोलिसाला थोडा मार लागला. अपघात किरकोळ स्वरुपाचा होता.

Police vehicle in NCP Chief Sharad Pawar's convoy meets with an accident
शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात 

थोडं पण कामाचं

  • शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात
  • शरद पवार म्हणतात, 'राजकारण नको'
  • चीनमुळे तणाव निर्माण झाला - शरद पवार

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका पोलिसांच्या वाहनाला अपघात (Sharad Pawar's convoy meets with an accident) झाला. या अपघातात एका पोलिसाला थोडा मार लागला. अपघात किरकोळ स्वरुपाचा होता. वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पोलिसांचे वाहन अचानक उलटले. ही घटना पुणे-मुंबई एक्सप्रेस वे (mumbai pune expressway) वर बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ घडली. अपघातात वाहनाचे थोडे नुकसान झाले. पवारांची गाडी ताफ्यात पुढे होती, त्यामुळे शरद पवार सुरक्षित आहेत. ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

शरद पवार यांचा सातारा दौरा

दोन दिवसांपूर्वी शरद पवार सातारा दौऱ्यावर आले होते. त्यांनी सातारा जिल्ह्यात कोरोना संकट हाताळण्यासाठी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

शरद पवारांनी साधला संवाद

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर पवारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. तसेच भारत-चीन हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून हा विषय गंभीरपणे हाताळणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी केंद्र सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर पाठिंबा जाहीर केला तसेच सुरक्षेच्या प्रश्नांवर राजकारण होणे योग्य नाही, असे सांगितले. 

सातारा दौऱ्यानंतर शरद पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सातारा दौऱ्यानंतर शरद पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पुण्यात पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह पुणे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. कोरोना संकटावर उपाय करण्यासाठी प्रशासन करत असलेल्या कामाचा शरद पवार यांनी आढावा घेतला. याच बैठकीत बोलताना आरोग्यमंत्री महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा महास्फोट होण्याची भीती व्यक्त केली. पुण्यातही पवारांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 

शरद पवार म्हणतात, 'राजकारण नको'

चीनने १९६२च्या युद्धानंतर भारताचा ४५ हजार चौरसकिलोमीटर भूभाग बळकावला असे वक्तव्य करताना यासाठी कोणाचे सरकार जबाबदार आहे हे सांगणे पवारांनी टाळले. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर राजकारण नको असे सांगितले. हा टोला राहुल गांधी यांना होता अशी चर्चा नंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली.

चीनमुळे तणाव निर्माण झाला - शरद पवार

गलवान खोऱ्यात भारत रस्त्याचे काम करत आहे. या कामात अडवणूक करण्यासाठी चीनने आक्रमक भूमिका घेतली. यातून पुढे संघर्ष झाला आणि तणाव निर्माण झाला, असेही पवार म्हणाले. पुणे दौरा आटोपल्यानंतर आज (सोमवारी) सकाळी शरद पवार पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. मुंबईला जात असतानाच एक्सप्रेस वे वर पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या एका वाहनाला सकाळी ९.३० वाजता किरकोळ अपघात झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी