भाजपच्या नगरसेवकाने पूजा चव्हाणचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप

पुणे
अजहर शेख
Updated Mar 04, 2021 | 15:01 IST

pooja chavan sucide case new twist : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस तपास सुरु असताना दुसरीकडे मात्र, दररोज पूजा चव्हाण प्रकरणातील नवे व्हिडिओ, फोटो आणि माहिती सोशल मीडियावर समोर येत आहे.

pooja chavan sucide case new twist
भाजपच्या नगरसेवकाने पूजा चव्हाणचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • नगरसेवक धनराज घोगरे यांचा फोन सध्या स्वीच ऑफ आहे
  • राठोड यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दयावा लागला
  • लॅपटॉपमध्ये संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्याशी संबंधित माहिती असण्याची शक्यता

पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्यानंतर सदर प्रकरणात पुन्हा एक मोठा खुलासा झाला आहे. दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सुरुवातीला संजय राठोड या मंत्र्याचे नाव समोर आले होते. सदर प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर राठोड यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दयावा लागला होता. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, यामध्ये भाजप (BJP) नगरसेवकाचे नाव पुढे आले आहे. या नगरसेवकाने या संपूर्ण प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे आणि माहिती असलेला लॅपटॉप चोरल्याची धक्कादायक माहिती  समोर आली होती. त्यानंतर हा नगरसेवक गायब झाला आहे. त्यामुळे आता पूजा चव्हाण प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे.

नगरसेवक धनराज घोगरे यांचा फोन सध्या स्वीच ऑफ

सध्या राज्यभरात गाजत असलेले पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वानवडीचे नगरसेवक धनराज घोगरे (Dhanraj Ghogare) यांनी लॅपटॉप चोरल्याचा दावा आहे. नगरसेवक धनराज घोगरे यांचा फोन सध्या स्वीच ऑफ आहे. याविषयी त्यांच्या कुटुंबीयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, धनराज घोगरे कालपासून घरीच आले नसून, ते सध्या आमच्य संपर्कात नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता पूजा चव्हाण प्रकरणात कोणता नवा उलगडा होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नेमकं जोन आहेत धनराज घोगरे?

धनराज घोगरे हे पुणे महापालिकेतील नगरसेवक आहेत.

वानवडी वॉर्डमधून भाजपच्या तिकीटावरून ते निवडून आले आहेत.

पुणे महापालिकेतील शहर विकास समितीचे उपाध्यक्षही आहेत.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाच्या बदनामी प्रकरणी दाखल गुन्ह्यात त्यांचे नाव

लॅपटॉपमध्ये संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्याशी संबंधित माहिती असण्याची शक्यता

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस तपास सुरु असताना दुसरीकडे मात्र, दररोज पूजा चव्हाण प्रकरणातील नवे व्हिडिओ, फोटो आणि माहिती सोशल मीडियावर समोर येत आहे. त्यामुळे हे फोटो कोण व्हायरल करत आहे? याची माहिती अद्याप मिळाली नाही. दरम्यान, सदर आत्महत्या झाल्यापासून पोलिसांनी पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप का ताब्यात घेतला नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, या लॅपटॉपमध्ये संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्याशी संबंधित माहिती असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी हा खटला दाखल केला

सदर खटला हा लीगल जस्टीस सोसायटी तर्फे अॅड. विजयसिंह ठोंबरे (Ad. Vijay Thombre) यांनी दाखल केला आहे. यापूर्वी पोलिसांना निवेदन देऊन देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे ठोंबरे यांच्या शिष्टमंडळाने न्यायालयात धाव घेतली असल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी