पुणे पोलिसांचं मंत्री संजय राठोडांबद्दल मोठ विधान, म्हणाले...

पुणे
अजहर शेख
Updated Feb 19, 2021 | 15:39 IST

pooja chavan sucide case : पूजा चव्हाण प्रकरणात भाजपने थेट संजय राठोड यांचं नाव घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर राठोड यांचा राजीनामा देखील मागितला होता.

pooja chavan sucide case :
पुणे पोलिसांचं मंत्री संजय राठोडांबद्दल मोठ विधान  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सर्वच अँगलने तपास करत आहोत – पुणे पोलीस
  • १२ दिवसांपासून संजय राठोड गायब
  • अरुण राठोड ताब्यात, मात्र संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई नाही

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (pooja chavan suicide case) राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी मंत्री संजय राठोड (minister sanjay rathod) यांना पूजा चव्हाणच्या आत्महत्येचा जबाबदर धरले आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तब्बल १२  दिवसानंतर मोठं विधान करत वन मंत्री संजय राठोड यांचीही चौकशी आवश्यकता असल्यास करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यासमोरील अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सर्वच अँगलने तपास सुरू

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर सदर प्रकरणाची चौकशी ही निष्पक्ष होत नसल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, आम्ही या प्रकरणाचा तपास सर्वच अँगलने करत आहोत, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सदर प्रकरणाची पुणे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली असून, आवश्यकता असल्यास पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड यांची देखील चौकशी करण्यात येईल असं स्पष्ट केल आहे. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

१२ दिवसांपासून संजय राठोड गायब

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड याचे नाव आल्यानंतर संजय राठोड गायब झाले आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात भाजपने थेट संजय राठोड यांचं नाव घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर राठोड यांचा राजीनामा देखील मागितला होता. तरीही गेल्या १२ दिवसांपासून राठोड मीडियासमोर आलेले नाहीत, त्यांनी आपली बाजूही मांडलेली नाही. मात्र, आता पुणे पोलिसांनी त्यांच्या चौकशीचे सुतोवाच केल्याने राठोड सर्वांसमोर येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

अरुण राठोड ताब्यात, मात्र संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई नाही

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ११ ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्या ऑडीओ क्लिपमधील आवाज अरुण राठोड या तरुणाचा असल्याचे बोलले जात होते. सदर प्रकरणानंतर अरुण राठोड हा देखील गायब झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. दरम्यान, दुसरा आवाज हा मंत्री संजय राठोड यांचा असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, १२ दिवस झाले तरी पोलिसांनी या प्रकरणी अद्याप राठोड यांची चौकशी किंवा त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. 

पुण्यात केली पूजा चव्हाणने आत्महत्या

पूजा चव्हाणने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तिच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. पूजाचे बीएचं शिक्षण पूर्ण झालं होतं. पूजा तिच्या चुलत भाऊ आणि एका मित्रासोबत पुण्यात राहत होती. पुण्यात ती स्पोकन इंग्लिशच्या कोर्ससाठी आली होती. पुण्यात येऊन दोनच आठवडे झाले होते तोच तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी