आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो : प्रकाश आंबेडकर

पुणे
अजहर शेख
Updated Oct 10, 2020 | 19:19 IST

prakash ambedkar on udayan raje: सुप्रीम कोर्टातून  मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज पेटून उठला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी राजकीय नेत्यांमध्येही चांगलेच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

prakash ambedkar on udayan raje
आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो- प्रकाश आंबेडकर   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो- आंबेडकर
  • उदयनराजे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं
  • 'प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद', तुळजापूरात घोषणाबाजी

पुणे: काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे  (vanchit bahujan aghadi) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी भाजपा नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhoale) यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. दरम्यान मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि उदयनराजे भोसले आमनेसामने आले असून, प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोडलेल्या टीकेला आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान उदयनराजे भोसले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात्तील वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो : प्रकाश आंबेडकर

प्रकश आंबेडकर यांनी ट्वीट करून आपले म्हणणे मांडले आहे. त्यांनी सदर ट्वीटमध्ये म्हटलं आहे, राजे सम्राट अशोक, (Samrat Ashok) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapti Shivaji Maharaj) आणि छत्रपती शाहू महाराज (Chhatrapti Shahu Maharaj) या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे आणि ती कायम राहील, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली आहे. 

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे (भोसले) (Chhatrapti Sambhajiraje) यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडले होते. त्यांनी म्हटलं होतं की ‘एक राजा तर बिनडोक आहे. असं मी म्हणेन, तर  दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी घेतलेली भूमिका ही बरोबर आहे. मात्र ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर जास्त भर देत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले होते. उदयनराजे भोसले आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं म्हणतात. भाजपने यांना राज्यसभेवर कसं पाठवलं तेच कळत नाही असा टोला देखील प्रकाश आंबेडकर यांनी लगावला होता.

'प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद', तुळजापूरात घोषणाबाजी

सुप्रीम कोर्टातून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज पेटून उठला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी राजकीय नेत्यांमध्येही चांगलेच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान पुढील काही काळात वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुळजापूर येथून तिसऱ्या पर्वाला सुरुवात करण्यात आली असून, इथल्या मराठा क्रांती ठोक मोर्च्यात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. ‘प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद’ अशा घोषणा देखील दिल्या गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी