PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहू दरम्यान तब्बल एवढ्या पोलिसांचा फौजफाटा, परिसराला छावणीचे स्वरूप

prime ninister narendra modi s visit in dehu : दुपारी एकच्या सुमारास पंतप्रधानांचे आगमन होईल. मोटारीने परंडवाल चौक, मुख्य कमानीमागे ते चौदा टाळकरी कमानीपर्यंत पोहोचतील. तेथून मुख्य मंदिरापर्यंत मंडप उभारला आहे. देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत २२ एकरच्या मैदानात सभा होईल

prime ninister narendra modi s visit in dehu
नरेंद्र मोदींच्या देहू दरम्यान तब्बल एवढ्या पोलिसांचा फौजफाटा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मोदी यांच्या देहू दौऱ्यासाठी पोलीस देखील सज्ज
  • मोदींचा कार्यक्रम पाहण्यासाठी स्क्रीनही उभारल्या आहेत
  • चारशे वारकरी टाळ-मृदंगांच्या गजरात पंतप्रधानांचे स्वागत करणार

PM Narendra Modi : पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जून मंगळवारी देहू येथे येत आहेत. मोदी यांच्या देहू दौऱ्यासाठी पोलीस देखील सज्ज झाल्याचे पहायला मिळत आहेत. दरम्यान, देहू नगरीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मंदिर परिसरात पास धारकांनाच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल. त्यामुळेच मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

अधिक वाचा : आजारी गायच्या उपचारासाठी ७ डॉक्टरांना ड्युटी, वाचा सविस्तर

मोदींचा कार्यक्रम पाहण्यासाठी स्क्रीनही उभारल्या आहेत

दुपारी एकच्या सुमारास पंतप्रधानांचे आगमन होईल. मोटारीने परंडवाल चौक, मुख्य कमानीमागे ते चौदा टाळकरी कमानीपर्यंत पोहोचतील. तेथून मुख्य मंदिरापर्यंत मंडप उभारला आहे. देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत २२ एकरच्या मैदानात सभा होईल. त्यासाठी तीन मंडप उभारले असून, चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी स्क्रीनही उभारल्या आहेत. या ठिकाणापासून जवळच तीन हेलिपॅड उभारले आहेत.

अधिक वाचा : सोन्याच्या चकाकीला अमेरिकन वेसण, चांदीदेखील घसरली, ताजा भाव 

चारशे वारकरी टाळ-मृदंगांच्या गजरात पंतप्रधानांचे स्वागत करणार

शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर मोदी माळवाडीच्या सभामंडपाकडे जातील. देहू संस्थानने मार्च महिन्यात मोदींना दिल्लीत जाऊन आमंत्रण दिलं होतं. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं असून मोदींनी येत्या १४ जूनची वेळ दिली होती. इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू इथे येणार आहेत. या दौऱ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. त्यात १० उपायुक्त,  २० सहाय्यक आयुक्त,  २५ पोलीस निरीक्षक, २९५ सहाय्यक निरिक्षक, २२७० कर्मचारी यासोबतच एसपीजी, एनएसजी, सीआरपीएफ, एसआरपीएफ.फोर्स वन पथकही तैनात आहेत.

अधिक वाचा : ७ सेकंदही अशी बायको नको म्हणत साजरी केली पिंपळपौर्णिमा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी