पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचं दिसून येत आहे. पुण्यात हे प्रमाण अधिक असल्याचं देखील पहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यात एका युवकाच्या हेत्येने मोठी खळबळ उडाली आहे. गिरीधर गायकवाड असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. गिरीधर गायकवाड हा अमरावती जिल्हातील असून, त्याची हत्या पुण्यात झाली आहे. गिरीधर गायकवाड याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे हत्या झालेला गिरिधर गायकवाड हा अमरावती कारागृहाचे अधिक्षक उत्तरेश्वर गायकवाड यांचा मुलगा आहे.
अधिक वाचा ; अपरा एकादशीच्या दिवशी या १० नियमांचे करा पालन, वाचा सविस्तर
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री गिरीधर गायकवाडच्या मोबाईल फोनवर एक फोन आला. गिरीधरने तो फोन उचलला आणि काही सेकंद त्याने समोरच्या व्यक्तीशी बोलला आणि फोन ठेवला. गिरीधरने याने जसाच फोन ठेवला तो तात्काळ घराबाहेर पडला. गिरीधरने घराबाहेर जात असताना त्याच्या भावाने विचारले कोणाचा फोन आला होता आणि तू कुठे चालला आहे. यावर गिरीधरने याने लगेच जाऊन येतो असं उत्तर दिले. मात्र , यानंतर गिरीधर घराबाहेर निघून गेला असता तो लवकर परतला नाही. बराच वेळ होऊनही गिरीधर घरी न आल्याने निखिलने त्याला पुन्हा फोन केला. तेव्हा फोनची एकदा रिंग वाजली आणि नंतर फोन बंद लागला. आता गिरीधरचा भाऊ निखीलने दिलेलेया फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
अधिक वाचा : D D वाहिनीवर 29 मे ला झळकणार अभिनेत्री मीरा जोशीचा लघुपट
गिरिधर याचा फोन लागत नसल्याने घरचे सर्वजण चिंतेत होते. एवढ्या काही मिनिटांनी गिरिधरचे वडील उत्तरेश्वर गायकवाड यांचा फोन आला. ग्लायडिंग सेंटरच्या मैदानात गिरीधर याचा खून झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर निखिल घटनास्थळी पोहचला असता तिथे गिरीधर याचा मृतदेह आढळला. तर गिरीधरवर कोयत्याने सपासप वार करुन हल्लेखोर सासवडच्या दिशेने पळून गेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या प्रकरणी चार पुरुष आणि तरुणीवर गुन्हा दाखल झाला असून प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू आहे. निखिलच्या जाण्याने त्याच्या घरी दुखाचे वातावरण आहे.
अधिक वाचा ; अर्जुनला मुंबई इंडियन्समध्ये संधी न मिळाल्याने सचिन म्हणाला.