Bus accident । मुंबई-बेंगलुरु महामार्गावर प्रवाशांनी खचाखच भरलेली लक्झरी बस पलटी, पाच जण गंभीर जखमी

mumbai-bengaluru highway bus accident : मुंबई-बेंगळुरू महामार्गावर पुण्यातील बावधन परिसरात प्रवाशांनी भरलेल्या बसला अपघात झाला.

Private bus overturned on Mumbai-Bengaluru highway
Bus accident । मुंबई-बेंगलुरु महामार्गावर प्रवाशांनी खचाखच भरलेली लक्झरी बस पलटी, पाच जण गंभीर जखमी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबई-बेंगलुरु महामार्गावर बसचा भीषण अपघात
  • चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी
  • पाच जखमी, उपचार सुरू

पुणे : मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या एका खासगी बसला अपघात झाला. पुण्यातील बावधनजवळ मुंबई-बेंगळुरू महामार्गावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बस अपघातात पाच जण जखमी झाले. (Private bus overturned on Mumbai-Bengaluru highway)

अधिक वाचा : राज्यातील अनेक भागात गारांचा पाऊस, रब्बीच्या पिकांला फटका

मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने जाणार्‍या परी शर्मा ट्रॅव्हल (KA ५१ AC १४४७) बावधन येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ पलटी झाली. ३६ प्रवाशी असलेली बस रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात जात असताना चालकाचं गाडीवरील अचानक नियंत्रण सुटल्याने ती बस सर्व्हिस रोडवर पलटी झाली. यात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. त्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अधिक वाचा : बाबा बागेश्वर मुंबईत येताच जमली मोठी गर्दी, गेट तुटल्यानं भाविकांना धक्काबुकी

अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व्हिस रोडवरील बस बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आली. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी