Pune Sex Racket : स्पा सेंटरमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार; पोलिसांनी टाकली धाड अन्...

Pune Crime News : पुणे ग्रामीण पोलिसांनी नांदेड सिटीतील स्पा सेंटरवर छापा टाकला आहे. वेश्याव्यवसायात गुंतलेल्या एक परदेशी व दोन स्थानिक मुलींची सुटका करण्यात आली.

Prostitution was going on in the spa center in Nanded, rescued three girls including a foreigner
Pune Sex Racket : स्पा सेंटरमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार; पोलिसांनी टाकली धाड अन्... ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुणे ग्रामीण पोलिसांनी नांदेड सिटीतील स्पा सेंटरवर छापा टाकला आहे.
  • पुण्यातील स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय
  • फाॅरेनरसह तीन मुलींची सुटका

पुणे : पुणे हायप्रोफायल टाऊनशीप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड सिटीतील स्पा सेंटरवर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला आहे. वेश्याव्यवसायात गुंतलेल्या एक परदेशी व दोन स्थानिक मुलींची सुटका करण्यात आली. सेंटर मॉलमधील ब्लू बेरी स्पा मसाज असे या स्पा सेंटरचे नाव आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Prostitution was going on in the spa center in Nanded, rescued three girls including a foreigner)

अधिक वाचा : २० हजारांसाठी अडीच किलो सोन्याच्या तस्करी केल्याप्रकरणी इंदूरच्या तरुणाला मुंबईत अटक

मसाज सेंटरचे मालक मुंजा रामदास शिंदे (वय ३१, रा. वडगाव, जिल्हा हवेली, पुणे), व्यवस्थापक योगेश पवार (रा. नांदेड, जिल्हा हवेली, जिल्हा पुणे), अथर्व प्रशांत ठके (वय १९, रा. धायरी, बेनकरवस्ती) जिल्हा हवेली अ. महिला व्यवस्थापक ज्योती विपुल वळिंबे (वय ३०, रा. रा. हा. ता. हवेली जि. पुणे) याच्याविरुद्ध चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ब्लू बेरी स्पा मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या सर्व प्रकाराची खातरजमा केली. या केंद्रात अतिरिक्त सेवांच्या नावाखाली हा धंदा सुरू असल्याची खात्री पोलिसांना झाली. यानंतर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून दुपारच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात मालक, दोन व्यवस्थापक आणि दोन तरुण सापडले. याप्रकरणी 3 पीडित महिला सुधारगृहात पाठवण्यात आल्या असून मालक-व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी