बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जर बारामती दौरा असेल तर मतदारसंघातील अनेक लोकं आपल्या तक्रारी थेट अजित पवार यांच्या कानावर घालतात. दरम्यान, अजित पवार देखील नागरीकंच्या तक्रारी व्यवस्थितपणे ऐकून घेत त्या सोडवण्यचा प्रयत्न करतात हे आपण अनेकदा पहिले असेलचं. आज मात्र अजित पवारांकडे एका शेतकऱ्याने थेट बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे हे अजित पवार यांच्या समोरचं उभे असताना सभेत उपस्थित असलेल्या एका ग्रामस्थाने पालखी मार्गातील नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे दोन टक्के कमिशन घेत असल्याची तक्रार थेट अजित पवार यांच्याकडे केली. यावेळी, भर सभेत असा गंभीर आरोप झाल्याने उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिक वाचा : Mothers Day निमित्त Social Media वर शेअर करा मराठी सुविचार
बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यावर जेव्हा हा गंभीर आरोप करण्यात आला तेव्हा दादासाहेब कांबळे यांना अजित पवार हे संत तुकाराम महाराज पालखी मार्गात घर गेले आहे. परंतु, त्याचा मोबदला मिळत नसल्याची तक्रार एका नागरिकाने यावेळी केली होती त्यावर तोडगा काढण्यासाठीच्या सूचना देत होते. मात्र, याचवेळी कांबळे यांच्यावर गंभीर आरोप झाला. त्यानंतर स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील यांना संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या सूचना देखील दिल्या.
अधिक वाचा : Mothers Day निमित्त Social Media वर शेअर करा मराठी शुभेच्छा
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) हे आज बारामती दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यानी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार देखील घेतला. त्याचबरोबर काटेवाडी या गावात एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाची सुरुवात आज करण्यात आली. अनेक नागरिकांनी अजित पवार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. यावेळी एका नागरिकाने जागेच्या मोजणीवरून सुरू असलेल्या वादाची तक्रार अजित पवार यांच्याकडे मांडली. दोन गटात वाद असल्यामुळे समोरचा व्यक्ती ऐकत नाही असे सांगितल्यानंतर अजित पवार चिडले असल्याचं पाहायला मिळाले. यावर त्यांनी तोडगा काढण्यासाठी "यांची एकत्र बैठक घेऊन मेळ बसतोय का पहा. या प्रकरणात अजित पवार आडवा आला तरी त्याला उचला अशा कडक सूचना कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या डीवाएसपींना अजित पवार यांनी दिल्या.
अधिक वाचा : Mothers Day निमित्त Social Media वर शेअर करा मराठी सुविचार