पुण्यात तरुणाने गायीवर केला बलात्कार

पुणे
रोहन जुवेकर
Updated Jun 04, 2022 | 18:35 IST

Pune: 22-year-old man rapes cow, criminal act caught on CCTV camera : महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. कुसगाव येथे राहणाऱ्या २२ वर्षांच्या दीपक राजवाडे याने गायीवर बलात्कार केला. या प्रकरणी सतीश कोकरे याने दीपक राजवाडे विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

Pune: 22-year-old man rapes cow, criminal act caught on CCTV camera
पुण्यात तरुणाने गायीवर केला बलात्कार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पुण्यात तरुणाने गायीवर केला बलात्कार
  • पोलिसांकडे तक्रार दाखल
  • पोलिसांनी जप्त केले सीसीटीव्ही फूटेज, तपास सुरू

Pune: 22-year-old man rapes cow, criminal act caught on CCTV camera : पुणे : महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. कुसगाव येथे राहणाऱ्या २२ वर्षांच्या दीपक राजवाडे याने गायीवर बलात्कार केला. या प्रकरणी सतीश कोकरे याने दीपक राजवाडे विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस तपास सुरू आहे.

मला ३१ मे रोजी गायीचा आवाज ऐकू आला. गायीचा आवाज ऐकून मी घराबाहेर आलो आणि जे काही बघितले त्याने धक्का बसला, असे सतीश कोकरे याने पोलिसांना सांगितले. दीपकचे कृत्य सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले आहे. सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तांत्रिक तपासणीसाठी पाठवले आहे.

तक्रारदार सतीश कोकरे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य घराबाहेर आले आणि सतीशने दीपकला ओळखले. यानंतर दीपक घटनास्थळावरून पळून गेला, असे सतीशने पोलिसांना सांगितले. सतीशने दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करून दीपकला शोधले आणि अटक केले. दीपक विरोधात लोणावळा पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. दीपकची चौकशी सुरू आहे. 

याआधी २३ एप्रिल २०२२ रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एका व्यक्तीने गायीवर बलात्कार केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी माजिद याला सरोजिनी नगरमधील दरोगा खेरा येथून अटक केली. या प्रकरणातही सीसीटीव्ही फूटेजमध्ये घटना घडल्याचे दिसले. पोलिसांनी फूटेज ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी