वारजे पुलावर विचित्र अपघात, गाडीचा चेंदामेंदा, एकाच कुटुंबातील चार जण....

पुणे
Updated Apr 14, 2022 | 15:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

pune 4 vehicle accident on varje bridge : या अपघातात वँगनार गाडीचा चक्काचूर झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील नवरा- बायको आणि दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर येथील महामार्गावर तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर त्यांना माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केले आहे. जखमीची नावं अदयाप समजली नाही. सदर अपघाताची घटना ही आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

pune 4 vehicle accident on varje bridge
वारजे पुलावर विचित्र अपघात, गाडीचा चेंदामेंदा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुण्यातील वारजे पुलावर आज सकाळी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला
  • एकाच कुटुंबातील नवरा- बायको आणि दोन मुली गंभीर जखमी
  • अपघातानंतर महामार्गावर तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या

पुणे : आज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान, पुण्यातील वारजे पुलावर आज सकाळी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघतामध्ये एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गेली काही दिवसांपासून पुण्यात अपघाताच्या अनेक भयंकर घटना घडल्या आहेत. यातच पुन्हा एक अपघाताची भयानक घटना आज घडली असून, या घटनेत एकाचं कुटुंबातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

अधिक वाचा : लग्नसराईत सोन्याच्या भावात येणार मोठी तेजी, लवकर करा खरेदी

अपघातानंतर महामार्गावर तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या

दरम्यान, या अपघातात वँगनार गाडीचा चक्काचूर झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील नवरा- बायको आणि दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर येथील महामार्गावर तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर त्यांना माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केले आहे. जखमीची नावं अदयाप समजली नाही. सदर अपघाताची घटना ही आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. माई मंगेशकर रुग्णालयाच्या समोरील पुलावर एका गाडीचा अचानक कमी वेग झाल्याने पुढील वँगनार गाडीवर मागील ट्रक धडकला तर पुढे टँकर असल्याने ही गाडी मध्येच चेंबली गेल्याने आत बसलेल्या व्यक्तींना समोरून आणि पाठीमागून जोरात मार लागला असल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर, हा अपघात इतका विचित्र,  होता, की गाडीचा कोणताही भाग ओळखता येत नव्हता.  

अधिक वाचा : हनुमान जयंतीच्या दिवशी करू नका ही ५ कामे, नाहीतर पडतील भारी 

दुसरी बातमी : परभणीच्या वारकऱ्यांच्या गाडीचाही विचित्र अपघात

पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन घरी परतत असताना परभणी जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित अपघाताची घटना ही बीड (Beed) जिल्ह्यात घडली आहे. अपघाताच्या या घटनेवर बीड आणि पंढरपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा : IPL: अनेक महिने क्रिकेट खेळू शकणार नाही चेन्नईचा हा खेळाडू

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी