Pune murder mystery solved: पुण्यातील भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सातही जणांची हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या सातही जणांनी आत्महत्या केली की हत्या याबाबत पोलिसांनी सखोल तपास केला आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. (Pune 7 members of family members death shocking information reveals in police investigation)
पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह काही दिवसांपूर्वी आढळून आले होते. 18 ते 22 तारीखेच्या कालावधीत हे सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. सुरुवातीला कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी विविध अँगलने तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात या सातही जणांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
हे पण वाचा : बडीशेप खा आणि चमत्कार पहा
मृतकांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. सुनियोजित कट रचून ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. अटक कऱण्यात आलेल्या आरोपींनी हत्येची कबुली दिल्याने या प्रकरणाचं गूढ उकललं आहे. या पाच आरोपींसोबतच इतरही आणखी आरोपी या प्रकरणात असून त्यांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
हे पण वाचा : गरोदरपणात चुकूनही करू नका हे काम
हे पण वाचा : जेवणात चुकून तिखट जास्त झाले तर काय करायचं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव या गावात भीमा नदीच्या पात्रात 18 ते 22 तारखेच्या या कालावधीत सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. त्यांची ओळख पटली होती. सर्व एकाच कुटुंबाचे होते. या प्रकरणाच्या तपासासाठी आम्ही वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अशोक कल्याण पवार, शाम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार आणि कांताबाई सर्जेराव जाधव यांचा समावेश आहे. हे सर्व अहमदनगरमधील निवासी आहेत. अशोक पवार यांचा मुलगा धनंजय पवार याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूला मोहन पवार यांचे कुटुंबीय जबाबदार असल्याचा संशय अशोक पवार यांना होता. त्या रागातून आणि कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचं समोर आलं आहे. पाचही आरोपी हे सख्खे भाऊ-बहीण आहेत.
हे पण वाचा : हे पदार्थ आहेत गुडघेदुखीवर रामबाण उपाय
अशोक पवार यांचा मुलगा धनंजय पवार आणि मृतक मोहन पवार यांचा मुलगा अमोल पवार हे दोघे तीन महिन्यांपूर्वी पेरणे फाटा येथे गेले होते. तेथून परतत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात धनंजय पवार याचा मृत्यू झाला होता. या अपघातासाठी आणि धनंजयच्या मृत्यूसाठी अमोल पवार कारणीभूत असल्याचा संशय अशोक पवार यांच्या कुटुंबीयांना होता. त्यामुळेच त्यांनी मोहन पवार यांचं संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.