Pune accident: पुण्यात भीषण अपघात, नवले पुलावर तब्बल 30 गाड्या एकमेकांवर आदळल्या

पुणे
सुनिल देसले
Updated Nov 21, 2022 | 13:53 IST

Pune accident news updates: पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 30 गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची माहिती समोर येत आहे. 

Pune accident around 30 vehicles collide with each other on navale bridge shocking photos goes viral read in marathi
Pune accident: पुण्यात भीषण अपघात, नवले पुलावर तब्बल 30 गाड्या एकमेकांवर आदळल्या 
थोडं पण कामाचं
  • पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात
  • अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या
  • अपघातात जवळपास 30 गाड्यांचे मोठे नुकसान

Pune Accident News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. नवले पुलावर भरधाव कंटेनरने धडक दिल्याने तब्बल 30 गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघाताचे फोटोज समोर आले असून ते पाहून अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवता येतो. (Pune accident around 30 vehicles collide with each other on navale bridge shocking photos goes viral read in marathi)

या भीषण अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने कंटेनर येत होता. या कंटेनरचे ब्रेक फेल झाले होते. ब्रेक फेल झाल्याने भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने समोर येणाऱ्या सर्व वाहनांना धडक देत पुढे गेला. या अपघातात 30 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. अपातात काहीजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात खूपच भीषण होता, त्यामुळे तेथे नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाल्याने त्याचा परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर सुद्धा झाला आहे. या अपघाताचे फोटोज सुद्धा समोर आले आहेत.

हे पण वाचा : म्हणून लहान मुले रात्रीचे जागतात

सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहने ही रस्त्यावरुन बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला केल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत होण्यास सुरुवात होईल.

हे पण वाचा : Google वर चुकूनही सर्च करू नका या गोष्टी, अन्यथा होईल जेल

पुण्यातील नवले पुलावर वारंवार अपघात होत असतात. अपघातांची मालिका ही सुरुच असल्याचं दिसून येत आहे. या अपघातांची मालिका थांबावी म्हणून नागरिकांनी अनेकदा आवाज सुद्धा उठवला आहे. मात्र, यावर अद्यापही कोणताही उपाय सापडला नाही आणि अपघातांची ही मालिका सुरुच असल्याचं दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी