Pune Accident: पुण्यात भीषण अपघात..! शिवशाही बस आणि कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, 7 जण जखमी

पुणे
Pooja Vichare
Updated Sep 19, 2022 | 08:59 IST

Pune Shivshahi Bus Accident: एसटी महामंडळाच्या शिवशाही बस (Shivshahi Bus) आणि कंटेरचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

Shivshahi bus terrible accident in Pune
पुण्यात शिवशाही बसचा चक्काचूर; कंटेनरला धडक, एकाचा मृत्यू, 7 जण जखमी 
थोडं पण कामाचं
  • एसटी महामंडळाच्या शिवशाही बस (Shivshahi Bus) आणि कंटेरचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
  • जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
  • हा अपघात एवढा भीषण होता की धडकेत कंटेनर आणि शिवशाही बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

पुणे: Terrible Accident In Pune: पुण्यातून एका अपघाताची (Accident) बातमी समोर येत आहे.  उरुळी देवाची हद्दीत हडपसर - सासवड (Hadapsar-Saswad)  रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बस (Shivshahi Bus) आणि कंटेरचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.  या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

संजय एकनाथ भायदे (रा.मुरुड, वय 52 वर्षे) असं मृत प्रवाशाचं नाव आहे. हा अपघात एवढा भीषण होता की धडकेत कंटेनर आणि शिवशाही बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या उरळी देवाची गावालगत रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. 

अधिक वाचा-  निवडणूक निकालाचा धुरळा, राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आज मतमोजणी

प्रत्यक्षदर्शींनी दिली माहिती

या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली की, पुणे-सासवड रस्त्यावर उरुळी फाट्यावर असलेल्या गोडाऊनमधून कंटेनर माल भरून निघाला होता. मात्र त्याचवेळी पुण्याच्या दिशेनं शिवशाही एसटी बस जात होती. बसचा वेग जास्त होता. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस कंटेनरला जाऊन जोरात धडकली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. कंटेनर सासवडहून पुण्याच्या दिशेनं जात होता. या अपघातात चालक, वाहक आणि त्यामधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

बसचा चक्काचूर 

ही बस पंढरपूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. या अपघात एवढा भीषण होता की बसचा पुढच्या भागचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

वाहतूक कोंडी 

या अपघाताने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कारण कंटेनर  रस्त्यात पूर्ण आडवा झाला होता.  क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त शिवशाही बस आणि कंटनेरला हटवण्यात आलं.  या दरम्यान अपघातामुळे उरुळी देवाची फाट्याजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता या मार्गावरची वाहतूक पूर्ववत झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी