Pune: मनसेतून शिंदे गटात प्रवेश केलेल्या निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या, पुण्यात राहत्या घरी आयुष्य संपवलं

Shinde Camp leader Nilesh Mazire wife suicide: शिंदे गटातील नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आयुष्य संपवलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Pune balasahebanchi shiv sena leader nilesh mazire wife commits suicide in maharashtra
Pune: मनसेतून शिंदे गटात प्रवेश केलेल्या निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या, पुण्यात राहत्या घरी आयुष्य संपवलं 
थोडं पण कामाचं
  • पुण्यातील धक्कादायक घटना
  • बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या
  • निलेश माझिरे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेतून शिंदे गटात केला होता प्रवेश

Pune News: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांच्या पत्नीने विषप्राशन करुन आत्महत्या केली आहे. पुण्यात आपल्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. निलेश माझिरे यांनी काही महिन्यांपूर्वीच शिंदे गटात (Shinde Camp) प्रवेश केला. 

निलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले. यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र, उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाहीये. मात्र, कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे पण वाचा : भारतात हा तांदूळ सर्वात जास्त खाल्ला जातो

निलेश माझिरे हे मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांनी पक्षातील अंतर्गत वादामुळे मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मनसेतून बाहेर पडल्यावर निलेश माझिरे यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटात गेल्यानंतर निलेश माझिरे यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.

हे पण वाचा : Board Exam: बोर्डाच्या परीक्षेवेळी करू नका या चुका

निलेश माझिरे हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक होते. काही महिन्यांपासून वसंत मोरे यांची पक्षात निर्माण झालेली स्थिती आणि त्यामुळे निलेश माझिरे हे सुद्धा काहीसे अडगळीतच पडले होते. निलेश माझिरे हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक होते आणि त्यांची ओळखही डॅशिंग नेता अशीच होती. मात्र, मनसेतील अंतर्गत कुरबुरींमुळे नाराज झालेल्या निलेश माझिरे यांनी अखेर मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी