Mukta Tilak dies in Pune: भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांचे निधन झाले आहे. मुक्ता टिळक या गेल्याकाही महिन्यांपासून आजारी होत्या. कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता शैलेश टिळक यांचे गुरुवार (22 डिसेंबर 2022) दुपारी 3.30 वाजता निधन झाले. शुक्रवारी (23 डिसेंबर) सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी 9 ते 11 वाजता केसरी वाडा येथे राहत्या घरी ठेवण्यात येईल. अंत्यविधी वैकुंठ स्मशामभुमी येथे सकाळी 11 नंतर होणार आहे.
हे पण वाचा : Instagram वर एका मिनिटात असे बनवा 10 हजार फॉलोअर्स, वाचा ट्रिक
लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी आहेत. मुक्ता टिळक यांचं शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झालं. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. मुक्ता टिळक या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कसबा पेठ विधानसभेतून भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी 2017 ते 2019 या काळात त्या पुणे महानगरपालिकेच्या महापौर होत्या. पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान मुक्ता टिळक यांना मिळाला.
हे पण वाचा : चुकूनही या 5 गोष्टी करू नका दान, अन्यथा व्हाल बर्बाद
कर्करोगाशी आमदार मुक्ता टिळक यांची झुंज सुरू असतानाच राज्याच्या विधानपरिषदेच्या मतदानासाठी त्या रुग्णवाहिकेने पुण्याहून मुंबईत आल्या होत्या. त्यानंतर व्हीलचेअरवरुन विधानभवनात दाखल होत आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.
मुक्ता टिळक यांनी आपल्या राजकीय क्षेत्रातील कारकीर्द 2002 पासून सुरू केली. भापजच्या तिकीटावर त्या सलग चार वेळा पुणे महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 2002, 2007, 2014 आणि 2017 अशा चार वेळा त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.
पुण्याच्या माजी महापौर तसेच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पुणे शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक असामान्य नेतृत्व हरपले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो भावपूर्ण श्रद्धांजली.... pic.twitter.com/gNhwm0ElL8
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 22, 2022
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.