आईसोबतचं आर्थिक भांडण मुलीच्या जीवाशी, पुण्यात घरात घुसून गळा आवळून हत्या

पुणे
पूजा विचारे
Updated Jun 28, 2022 | 13:08 IST

पुण्याच्या (Pune) चाकण (Chakan) भागात एका 18 वर्षांच्या तरुणीची हत्या करण्यात आली आहे.

Representative Image
पुण्याच्या (Pune) चाकण (Chakan) भागात एका 18 वर्षांच्या तरुणीची हत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आरोपीनं पीडित तरूणीची गळा दाबून हत्या केली आहे.
  • पीडित तरूणी आपल्या 47 वर्षीय आईसोबत राहत होती.
  • 20 वर्षांच्या तरुणानं ही हत्या केल्याचं उघड झालं आहे.


पुणे: पुण्याच्या (Pune) चाकण (Chakan)  भागात एका 18 वर्षांच्या तरुणीची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 20 वर्षांच्या तरुणानं ही हत्या केल्याचं उघड झालं आहे. आरोपीनं पीडित तरूणीची गळा दाबून हत्या केली आहे. पैशांवरून पीडितेच्या आईसोबत झालेल्या भांडणामुळे आरोपीनं हा गुन्हा केल्याचं समजतंय. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, संशयिताचे नाव विष्णुकुमार साहा असे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरूणी आपल्या 47 वर्षीय आईसोबत राहत होती. तसंच हत्या झाली त्यावेळी पीडित तरूणी एकटीच घरी होती. तेव्हा हल्लेखोरानं घरात घुसून तिची हत्या केली. 

अटक करण्यात आलेला व्यक्ती आणि पीडितेची आई एका खासगी कंपनीत एकत्र काम करायचे आणि नुकताच त्यांचा काही पैशांवरून वाद झाला होता. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी सांगितलं की, आईसोबतच्या आर्थिक वादासोबतच पीडित तरूणी आपल्या फोनला उत्तर देत नसल्यानं आरोपी मुलीवर रागावला होता. ही बाब तपासात समोर आली आहे.

अशीच एक धक्कादायक घटना या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशातून समोर आली होती. ज्यामध्ये 1.5 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 10 वर्षीय मुलाचे त्याच्या वडिलांच्या मित्रानं अपहरण केलं होतं आणि नंतर गळा दाबून हत्या करण्यात आली होती. मुकेश कुमार असं आरोपीचे नाव आहे.

दोरीने मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपींनी मुलाचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. अपहरणाच्या रात्री खंडणीसाठी फोन केल्यानंतरच आपण आणि  साथीदाराने दोरीच्या सहाय्याने मुलाचा गळा आवळून खून केल्याची कबुली मुकेशने पोलिसांना दिली. नंतर त्यांनी मृतदेह निलन कालव्यात फेकून दिला. पोलिसांनी मुकेश आणि त्याचा सहकारी विकास कुमार यांना अटक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी