Pune: पुणे (Pune)शहरात सेक्सटोर्शनच्या(sextortion)घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या वाढत्या प्रकरणांमुळे पोलीस यंत्रणा (Police system)अलर्ट मोडवर आली आहे. गेल्या काही दिवसात पुण्यातील सायबर सेल (Cyber cell) पुणे येथे 1400 तक्रारी मिळाल्या आहेत. ही आकडेवारी जानेवारी 2022 ते मध्य ऑक्टोबर 2022 मधील आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरवरुन या सेक्सटोर्शनच्या प्रकरणात इतकी वाढ झाली आहे. दरम्यान काहीजण बेअब्रु होण्याच्या भीतीने याप्रकरणात तक्रार करत नाहीत. नाहीतर तक्रारीचा हा आकडा अजून वाढलेला दिसला असता. (increased incidence of sextortion in Pune, cyber cell on alert mode)
अधिक वाचा : Bhandup: शॉर्टसर्किटमुळे चायनीज सेंटरला भीषण आग
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सायबर सेलमध्ये आलेल्या एका प्रकरणाविषयी सांगितले की, एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांच्या संपूर्ण पेन्शनचे 10 लाख रुपये ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना देऊन टाकले. इतकी मोठी रक्कम गायब झाल्यानंतर त्या बळी ठरलेल्या वुद्धाच्या घरात खळबळ उडाली सर्वांशी चर्चा केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यानंतर ते बँक खाते बंद करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
अधिक वाचा : जर तुम्हाला सतत पराभव होत असेल तर सिंहाचा हा गुण ठेवा लक्षात
आणखी एका प्रकरणात एक माणसाने 1.13 लाख रुपये गमावले. या प्रकरणाची तक्रार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात आली आहे. आयपीसी कलम 419, 420 अंतर्गत फसवणूक - अप्रामाणिकपणा आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 (cheating - dishonesty and Information Technology Act 2000). अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे म्हणाले की, या प्रकरणात बळी ठरलेल्या व्यक्तीला एका अनोळखी नंबरवरुन तुझ्यासाठी सरप्राईज' अशी एक लिंक मिळाली.
अधिक वाचा : यंदाची दिवाळी पावसातच; येत्या 5 दिवसांत राज्यभर बरसणार
या लिंकमध्ये त्या व्यक्तीचे मॉर्फ केलेले व्हिज्यूअल होते. त्यानंतर त्याला पैसे देण्यास भाग पाडले. IFSC कोड आणि Google pay द्वारे पैसे पाठवण्यास सांगितले. हा प्रकार दोन-तीन वेळा घडला. लैंगिक शोषणाच्या इतर दोन प्रकरणांमध्ये, बदनामीच्या भीतीने पीडितांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले. यातील एकाने आयटीआय पास व्यावसायिक वय वर्ष 30 असलेली व्यक्तीने मानसीक छळामुळे गळफास लावून घेतला.
दुसऱ्या प्रकरणात 22 वर्षीय व्यक्तीने इमारतीच्या 10 मजल्यावरुन उडी आपला जीव दिला. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या भावाने माहिती दिली की, एका अनोळखी तरुणीकडून इन्स्टाग्रामवर त्याच्या नग्न फोटोंद्वारे त्याला धमकावले जात आहे. याप्रकरणी आयपीसी कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 384 (खंडणीसाठी शिक्षा) आणि आयटी कायदा 2000 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मॉडेलिंग एजन्सी चालवणारा योगेश पवारही या रॅकेटमध्ये अडकला होता.
आपला अनुभव सांगताना त्याने सांगितले की, “फक्त मीच नाही तर माझे सहकारीसुद्धा सेक्सटोर्शनच्या दुष्ट चक्रात अडकले होते. मी कोणाचे नाव सांगू शकत नाही परंतु त्यातील एकाने आत्महत्या केली आहे. मलाही एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी चॅटिंग सुरू केल्यानंतर, मला व्हिडिओसाठी विनंती करण्यात आली. माझ्याकडेही पैसे मागितल्याची पोस्ट करण्यात आली. पण मी लगेच सायबर क्राईम शाखेशी संपर्क साधला. मी लोकांना विनंती करतो की न घाबरता पोलिसांना माहिती द्या. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत, परंतु जे लोक बेपर्वाईने आभासी माध्यम वापरतात आणि त्यांचे वैयक्तिक तपशील शेअर करतात त्यांच्यासाठी अशी प्रकरणे डोळे उघडणारी आहेत.