Minor Girl Raped : पुणे : पुण्यात एका शाळेच्या बस चालकाने एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सोमेश्वर पाटील याला अटक केली आहे. (pune dalit minor girl raped by school bus driver)
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोंढवा भागात एक १५ वर्षीय मुलगी शाळेत दहावीत शिकत होती. ती शाळेच्या बसने यायची जायची. यावेळी तिची ओळख बसचालक सोमेश्वर पाटील याच्याशी झाली. रविवारी विद्यार्थिनी खासगी ट्युशनसाठी घराबाहेर पडली होती. घरी येताना बसचालक सोमेश्वर पाटीलने या मुलीला फोन केला आणि एका निर्जन ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले.
अधिक वाचा : Nagpur Rape Case: धक्कादायक! नोकरीचं आमिष दाखवून उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार
त्यानंतर सोमेश्वर पाटीलने मुलीला एका पडक्या इमारतीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घरी आल्यानंतर झाली हकीगत आपल्या कुटुंबीयांना सांगितली. तेव्हा पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत कारवाई करत नराधम आरोपी सोमेश्वर पाटीलला अटक केली आहे.
आरोपी पाटीलचे लग्न झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पीडित मुलगी दलित असल्याने पोलिसांनी आरोपी पाटील विरोधात ऍट्रोसिटी अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : लाजिरवाणं कृत्य... सावत्र बापानेच केला बलात्कार... मुलगी राहिली गरोदर...