Pune crime news: पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार जण एका खोलीत मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात चार जण मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुले खोलीत मृतावस्थेत आढळून आले. (Pune four members of a family found dead in residence at mundhwa area read details in marathi)
दीपक थोटे, इंदू थोटे आणि त्यांची दोन मुले ऋषिकेश थोटे, समीक्षा थोटे अशी मृतकांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच हे कुटुंब मुंढवा परिसरात राहण्यास आले होते. हे कुटुंब अमरावतीहून पुण्यात शिफ्ट झाले होते.
Maharashtra | Four members of a family including a couple, a 24-year-old son & a 17-year-old daughter were found dead at their residence in Keshav Nagar, Mundhwa area of Pune. Prima facie suspected case of suicide. Bodies sent for postmortem. Probe underway: Pune Police Officials — ANI (@ANI) January 13, 2023
हे पण वाचा : झोपण्यासाठी अशी खरेदी करा मऊ गादी, आयुष्याची होईल चांदी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक नुकसान झाल्याने आलेल्या नैराश्येतून या कुटुंबाने आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे कुटुंब दोन महिन्यांपूर्वी अमरावतीहून पुण्यात वास्तव्यास आले होते. शेअर बाजारात नुकसान झाल्याने आत्महत्येसारखं पाऊल उचललं असं बोललं जात आहे.
हे पण वाचा : लग्नानंतर महिला नाकात नथ का घालतात? वाचा...
या कुटुंबीयांच्या शेजारी राहणाऱ्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला मात्र, समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर घराचा दरवाजा जेव्हा उघडला गेला तेव्हा कुटुंबातील चौघेही जण मृतावस्थेत आढळून आले. संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन करुन आपलं जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.