पुण्याच्या गोल्डमॅनकडून पत्नीचा छळ, मारहाण करुन गर्भपात केल्याचा आरोप 

Pune Gold Man Sunny Waghchaure: गोल्डमॅन अशी ओळख असलेल्या पुण्यातील सनी वाघचौरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपला छळ केल्याचा आरोप करत पत्नीने गुन्हा दाखल केला आहे. 

sunny waghchaure
पुण्याचा गोल्डमॅन सनी वाघचौरेकडून पत्नीचा छळ  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • पुण्याच्या गोल्डमॅनकडून पत्नीचा छळ
  • मारहाण करुन गर्भपात केल्याचा पत्नीचा आरोप 
  • पत्नीकडून पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

पुणे : आपल्या अंगावर किलोहून अधिक सोन्याचे दागिने घालून फिरणारा पुण्यातील गोल्डमॅन (Gold Man) सनी वाघचौरे (Sunny Waghchaure) हा सर्वांनाच परिचित आहे. मात्र, याच गोल्डमॅनने गृहपयोगी वस्तुंसाठी पत्नीला मारहाण करुन छळ केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी सनी वाघचौरे याच्या पत्नीने चिंचवड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर २०२०) हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीये.

गोल्डमॅनवर पत्नीचा गंभीर आरोप

सनीच्या पत्नीने आरोप केला आहे की, आपल्या आई-वडिलांकडून गृहपयोगी वस्तू घेतल्या. तसेत मारहाण, शिवीगाळ करुन धमकी सुद्धा दिली. इतकेच नाही तर गर्भपाताची ओषधे देवून माझा गर्भपात घडवून आणला. 

पीडित महिलेने आरोप केला आहे की, २३ मार्च २०११ पासून आतापर्यंत (२२ ऑक्टोबर २०२०) आपला छळ केला जात होता. या काळात माझा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचंही पीडित महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

गोल्डमॅनसह कुटुंबातील इतरांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी पीडित महिलेने सनी वाघचौरे (३१ वर्षे), सासू आशा वाघचौरे (वय ५५६ वर्षे), सासरे नाना वाघचौरे (वय ६० वर्षे), नणंद निता या चौघांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात २६२/२०२० भा.द.वि. क. ४९८ (अ), ३१३, ५०४, ३३६, २९२, ३४ कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

दागिन्यांमुळे प्रसिद्धी

सनी वाघचौरे याला पूर्वी फार कोणी ओळखत नव्हते. मात्र, अंगावर सोन्याचे दागिने घालून तो खूपच प्रसिद्ध झाला. त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की बॉलिवूड कलाकालांसोबतही त्याचे फोटोज येऊ लागले. अनेक कार्यक्रमांना त्याची उपस्थिती पहायला मिळू लागली. सोशल मीडियातही त्याला खूप प्रसिद्धी मिळू लागली. सोशल मीडियात त्याचे हजारो फॉलोअर्सही आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी