पुण्याच्या राजकीय कुटुंबातील तरुणाचा क्रिकेट खेळताना दम लागून मृत्यू

pune hadapsar 22-years old sritej sachin ghule dies : अचानक तरणाताठा मुलगा गेल्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रीतेजला मोठा मित्र परिवार होता. श्रीतेजच्या अकस्मात मृत्यूने हडपसर परिसरात शोककळा पसरली आहे. श्रीतेज हा राजकीय कुटुंबातील मुलगा होता. हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले आणि उंद्री गावच्या माजी सरपंच श्वेता घुले यांचा तो मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

pune hadapsar 22-years old sritej sachin ghule dies
राजकीय कुटुंबातील तरुणाचा क्रिकेट खेळताना दम लागून मृत्यू   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • क्रिकेट खेळताना एका तरुण मुलाचा जीव गेला
  • खेळत खेळता श्रीतेजला अचानक दम लागला आणि तो जमिनीवर कोसळला
  • अचानक तरणाताठा मुलगा गेल्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला

पुणे : पुण्यातील हडपसर भागातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळताना एका तरुण मुलाचा जीव गेला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट खेळताना दम लागला आणि तरुणाचा जीव गेला असून, सदर घटनेमुळ परिसारत शोककळा पसरली आहे. श्रीतेज सचिन घुले असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. श्रीतेज सचिन घुले हा तरुण २२ वर्षाचा होता. तर मयत मुलाचे वडील हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती आहेत, तर आई उंद्री गावच्या माजी सरपंच आहेत.

अधिक वाचा :  वट पोर्णिमेचा उपवास करताय, चुकूनही करू नका या चुका नाहीतर...

खेळत खेळता श्रीतेजला अचानक दम लागला आणि तो जमिनीवर कोसळला

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास श्रीतेज हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. हडपर भागातील हंडेवाडी परिसरातील मैदानावर ते सतत क्रिकेट खेळत होते. मात्र, रविवारी क्रिकेट खेळत असताना त्याला अचानक दम लागला आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला त्याच्या मित्रांनी तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. कुठल्याही प्रकारचा आजार किंवा दुखणे नसताना शहा धक्कादायक प्रकार घडल्याने कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे. हाता-तोंडाशी आलेल्या लेकाचा अचानक मृत्यू झाल्याने हळहळ देखील व्यक्त केली जात आहे.  

अधिक वाचा : Dinesh Karthik: दिनेश कार्तिक धोनीबद्दल असा काही बोलला की... 

अचानक तरणाताठा मुलगा गेल्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला

अचानक तरणाताठा मुलगा गेल्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रीतेजला मोठा मित्र परिवार होता. श्रीतेजच्या अकस्मात मृत्यूने हडपसर परिसरात शोककळा पसरली आहे. श्रीतेज हा राजकीय कुटुंबातील मुलगा होता. हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले आणि उंद्री गावच्या माजी सरपंच श्वेता घुले यांचा तो मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा : सोन्याच्या चकाकीला अमेरिकन वेसण, चांदीदेखील घसरली, ताजा भाव

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी