Pune Rain: पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साचलं 

पुणे
Updated Oct 09, 2019 | 23:00 IST

पुण्यात पावसानं पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. शहरातील विविध भागांत पाणी साचायला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसानं हजेरी लावली. जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी झाडं पडलीत.

Pune Rain
Pune Rain: पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस, एकाचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पुण्यात पावसानं पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे.
  • शहरातील विविध भागांत पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
  • संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसानं हजेरी लावली.

पुणेः पुण्यात पावसानं पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. शहरातील विविध भागांत पाणी साचायला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, अलका चौक, सिंहगड रोड, भांडारकर रस्ता परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे. 

जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये टिळक रोड परिसरात ग्राहक पेठेसमोरून जात असलेल्या एका पीएमपी बसवर मोठं वडाचं झाड कोसळले. या दुर्घटनेत बस चालकाचा गंभीररित्या जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. विजय नवघणे असं मृत चालकाचे नाव आहे. तसंच गुरूवार पेठ येथील शितळादेवी चौक परिसरातही एक मोठं झाड कोसळलं आहे. 50 हून अधिक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. कोथरूड, कर्वेनगर, एरंडवणे, लॉ कॉलेज रोड, सहकार नगर या भागातील झाडं पडलीत. 

शहरातील सिंहगड रोड, टिळक रोड, सदाशिव पेठेसह अनेक भाग आणि उपनगरातली वीज गायब झाली आहे. पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत आणि पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.  सिंहगड रोड भागात जोरदार पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झाली.  संतोष हॉल येथील मधुकर हॉस्पिटलजवळ रस्त्यावर पाणी साचले. सिंहगड रोड परिसर, वडगाव बुद्रुक, नऱ्हे परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. शिवाजी रस्त्यावर पाणीच पाणी, संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. 

राज ठाकरे यांची सभा रद्द

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा रद्द करण्यात आली आहे. आज पुण्यातील सरस्वती शाळेच्या मैदानावरुन राज ठाकरे विधानसभेच्या प्रचाराचा श्रीगणेशा होणार होता. सभेच्या ठिकाणी मुसळधार होत असल्यानं मनसेनं ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला.  काल रात्री पुण्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मैदानावर चिखल आणि पाणी साचलं होतं. तरीही सुद्धा मनसेचे नेते, कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर मैदानावर साफसफाईचं काम केलं. तरीही मुसळधार पावसानं खूप नुकसान झालं. आताच्या पावसामुळे मैदानात चिखल आहे. मैदानातील खुर्च्यांही पाण्यात गेल्यात. पावसामुळे सभेसाठी उभारलेलं स्टेज, साऊडं सिस्टमचंही नुकसान झालं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...