पुण्यात Income Tax अधिकाऱ्याच्या घरी चोरी, मोलकरीणच निघाली मास्टरमाईंड 

Pune Crime News: पुण्यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात चोरी झाली. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • महिला अधिकाऱ्याच्या घरातून लाखो रुपयांचे सोने, रोकड चोरी 
  • घरातील मोलकरणीने मित्राच्या मदतीने केली होती चोरी
  • पोलिसांनी तपास करत आरोपींना केली अटक

Pune News: बेहिशेबी मालमत्ता आणि कर चुकवणाऱ्यांवर करडी नजर ठेवणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याच्याच घरात चोरीची घटना घडली आहे. पुण्यातील एका महिला अधिकाऱ्याच्या घरात ही चोरी झाली असून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी झाली होती. पुण्यातील सेव्हन लव्स चौकाजवळील इमारतीत ही घटना घडली होती. या घटनेनंतर संबंधित महिला अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. (Pune income tax officer house robbed by maid police arrest accused crime news marathi)

तक्रार दाखल होताच पोलिसांनी आपला तपास सुरू केला. त्यानंतर मोलकरीणच चोरी करणारी मास्टरमाईंड निघाली. मोलकरीणीने आपल्या मित्राच्या सहाय्याने ही चोरी केली होती. पोलिसांनी या प्रकरणी मोलकरणीसह इतर दोघांना अटक केली आहे.

अधिक वाचा : मुंबईत महिलेची छेड काढणाऱ्यांस शिवसैनिकांनी पकडले

कपाटातून सोन्याचे दागिने लंपास

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या अधिकारी या आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या घरी गेल्या चार वर्षांपासून एक महिला मोलकरीण म्हणून काम करत होती. ही घटना मार्च २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान घडली होती. मात्र, जुलै महिन्यात आयकर विभागातील अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना लक्षात आले की, घरातील मंगळसूत्र, अंगठ्या आणि इतर मौल्यवान साहित्यांची चोरी झाली आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या घटनेनंतर मोलकरणी रेखा क्षिरसागर हिने आपली नोकरी सोडली होती. तिने नोकरी सोडल्याने कुटुंबीयांना तिच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली. तसेच रेखाच्या बँक खात्याची माहिती घेतली, कॉल डिटेल्स तपासले असता बँक खात्यात मोठी रक्कम असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी रेखाला चौकशीला ताब्यात घेतले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी रेखा हिच्यासह तिच्यासोबतच्या इतरांनाही अटक केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी