Kasba Chinchwad by election 2023: कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, वाचा कोणाला मिळाली संधी

पुणे
सुनिल देसले
Updated Feb 05, 2023 | 10:44 IST

Kasba Chinchwad by election 2023 BJP announced candidates: पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

Pune Kasba Peth chinchwad assembly bypolls bjp announced candidates ashwini laxman jagtap and hemant narayan rasane
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, वाचा कोणाला मिळाली संधी (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक
  • भाजपने दोन्ही जागांवर उमेदवार केले जाहीर

Pune Kasba Peth chinchwad assembly bypolls : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजप आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनाने कसबा पेठ आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागांवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली असून या पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. (Pune Kasba Peth chinchwad assembly by-polls bjp announced candidates ashwini laxman jagtap and hemant narayan rasane)

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

कोण आहेत अश्विनी जगताप?

अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर कोणाला उमेदवारी दिली जाणार यावरुन विविध चर्चा सुरू होत्या. लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील सदस्याला संधी दिली जाणार असे बोलले जात होते आणि अखेर भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

हे पण वाचा : खोकल्यावर घरगुती आणि रामबाण उपाय

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूकीसाठी मतदान, रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

हे पण वाचा : ही लक्षणे दिसल्यास समजून जा तुम्हाला लिव्हरची समस्या आहे

  1. मंगळवार 7 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. 
  2. प्राप्त उमेदवारी अर्जांची बुधवार 8 फेब्रुवारी 2023 रोजी छाननी होईल. 
  3. शुक्रवार 10 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. 
  4. त्यानंतर रविवार, 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होईल. 
  5. गुरुवार, 2 मार्च 2023 रोजी मतमोजणी होईल. 
  6. शनिवारी, 4 मार्च 2023 रोजी निवडणुकिची प्रक्रिया पूर्ण होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी