Pune Kasba Peth, Pimpri-Chinchwad By Election Result 2023: पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पार पडल्यावर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या मतमोजणीकडे. या निवडणुकीत भाजप विजयी होणार की आपल्या जागा गमावणार? यावरुन अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहेत. दोन्ही जागांसाठी 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून गुरुवार, 2 मार्च 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीचे लाईव्ह अपडेट्स कधी आणि कुठे पाहता येईल पाहूयात...
कसबा आणि चिंचवड या मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान झाले. त्यानंतर आता 2 मार्च रोजी मतमोजणी होत आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवार 2 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सुरुवात होणार आहे.
कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी गुरुवार 2 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपासून कोरेगाव पार्कपरिसरातील भारतीय अन्न महामंडळ गोदाम येथील मतमोजणी केंद्रावर होईल.
कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे अपडेट्स, लाईव्ह ट्रेंड्स तुम्ही निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.
कसबा पेठ आणि चिंचवड पोट निवडणुकीचे लाईव्ह अपडेट्स तुम्ही www.timesnownews.com/live-tv चॅनलवर सुद्धा पाहू शकता. तसेच टाइम्स नाऊ मराठीच्या www.timesnowmarathi.com वेबसाईटवर निकालाचे सर्व अपडेट्स पहायला मिळतील.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत 26 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान झाले होते तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत 26 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 41.1 टक्के मतदान झाले होते.
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकालापूर्वी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. स्ट्रेलिमा या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप कसबा पेठ विधानसभा गमावणार असल्याचं दिसत आहे तर चिंचवडची जागा राखणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एक्झिट पोलनुसार, कसबा पेठ येथे भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे 15 हजारांहून अधिक मतांनी विजयी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, भाजपच्या हेमंत रासने यांना 59,351 मते मिळतील तर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना 74,428 मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चिंचवड विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना 1,25,354 मते मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना 93,003 मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.