पुण्यातील मराठा आरक्षणावरील परिषद रद्द, उदयनराजेंकडून गेले या निर्णयाचे निरोप

पुणे
Updated Oct 30, 2020 | 16:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने पुण्यात आयोजित करण्यात आलेली मराठा आरक्षण परिषद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उदयनराजेंनी सर्व आमंत्रितांना परिषद रद्द झाल्याचा निर्णय कळवला आहे.

Udayanraje Bhosale
पुण्यातील मराठा आरक्षणावरील परिषद रद्द, उदयनराजेंकडून गेले या निर्णयाचे निरोप 

थोडं पण कामाचं

  • रद्द करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट
  • उदयनराजेंनीच घेतला परिषद रद्द करण्याचा निर्णय
  • विद्यार्थ्यांना पाहावी लागणार आणखी वाट

पुणे: भाजपा खासदार (BJP MP) उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या पुढाकाराने आज पुण्यात (Pune) मराठा आरक्षण परिषदेचे (Maratha Reservation Conference) आयोजन करण्यात आले होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी (deciding future course) हे आयोजन करण्यात आले होते. मात्र एबीपी माझाने दिलेल्या बातमीनुसार आता ही परिषद रद्द (conference cancelled) करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या खटल्यातील याचिकाकर्ते (petitioners in reservation case), कायद्याचे अभ्यासक (legal experts) यांच्यासह अनेकजण या परिषदेला उपस्थित राहणार होते.

रद्द करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट

मराठा आरक्षण परिषद रद्द करण्यामागे नेमके काय कारण आहे याबद्दल अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. फक्त परिषद रद्द झाल्याचे कळते आहे. भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून ही परिषद रद्द झाल्याचा निरोप देण्यात आला आहे. आज दुपारी दोन वाजता पुण्यातील रेसिडेन्सी क्लबमध्ये ही परिषद होणार होती. यात उदयनराजेंसह मराठा आरक्षणासाठी लढणारे वकील, याचिकाकर्ते, अभ्यासकही येणार होते. मराठा आरक्षणाची पुढची दिशा येथे ठरवण्यात येणार होती. मात्र या सर्व आमंत्रितांना परिषद रद्द झाल्याचे निरोप देण्यात आले आहेत.

उदयनराजेंनीच घेतला परिषद रद्द करण्याचा निर्णय

मराठा आरक्षण परिषद रद्द करण्याचा निर्णय उदयनराजे भोसले यांनीच घेतला आहे. ते सध्या पुण्यातच आहेत. ते परिषदेच्या ठिकाणीही येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र परिषद अचानक रद्द करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या परिषदेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल अशी विद्यार्थ्यांना आशा होती, मात्र आता त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी