पुणे: महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना, रुग्णालयात दाखल 

Pune Mayor Murlidhar Mohol: पुण्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

pune mayor murlidhar mohol
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पुण्याला कोरोनाचा विळखा 
  • पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना 
  • महापौर मुरलीधर मोहोळ यांना उपचारासाठी केलं रुग्णालयात दाखल 

Pune Mayor tests Covid19 positive: महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे शहरांना (Pune City) कोरोनाने विळखा घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Pandemic) रोखण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत असताना आता महापौरांनाच कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: ट्वीट करुन कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत म्हटलं, "थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड१९ टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील".

पुणे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती काय?

पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या २६,९५६ इतकी आहे. यापैकी १३,०६४ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ८४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्य स्थितीत १३,०५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे मंडळातील कोरोनाची स्थिती काय?

  1. पुणे - बाधित रुग्ण - (२२४७), मृत्यू - (६९)
  2. पुणे मनपा - बाधित रुग्ण - (२१३५४), मृत्यू - (७०९) 
  3. पिंपरी चिंचवड मनपा - बाधित रुग्ण - (३३५५), मृत्यू - (६३) 
  4. सोलापूर - बाधित रुग्ण - (४८८), मृत्यू - (२३) 
  5. सोलापूर मनपा - बाधित रुग्ण (२६१८), मृत्यू - (२६९)
  6. सातारा - बाधित रुग्ण (१२७४), मृत्यू (४८)

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  1. मुंबई: बाधित रुग्ण- (८३,२३७), बरे झालेले रुग्ण- (५३,३६३), मृत्यू- (४८३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४,९३६)
  2. ठाणे: बाधित रुग्ण- (४५,८३३), बरे झालेले रुग्ण- (१७,८५१), मृत्यू- (१२५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६,७२७)
  3. पालघर: बाधित रुग्ण- (७१७३), बरे झालेले रुग्ण- (२९००), मृत्यू- (१२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१५१)
  4. रायगड: बाधित रुग्ण- (५५८५), बरे झालेले रुग्ण- (२६८६), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७९१)
  5. रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (६९९), बरे झालेले रुग्ण- (४५८), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१४)
  6. सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२३९), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०)
  7. पुणे: बाधित रुग्ण- (२६,९५६), बरे झालेले रुग्ण- (१३,०६४), मृत्यू- (८४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३,०५१)
  8. सातारा:  बाधित रुग्ण- (१२७४), बरे झालेले रुग्ण- (७६३), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६२)
  9. सांगली: बाधित रुग्ण- (४१७), बरे झालेले रुग्ण- (२४७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५९)
  10. कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८९५), बरे झालेले रुग्ण- (७३२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५१)
  11. सोलापूर: बाधित रुग्ण- (३१०६), बरे झालेले रुग्ण- (१६७३), मृत्यू- (२९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (११४०)
  12. नाशिक: बाधित रुग्ण- (४९३३), बरे झालेले रुग्ण- (२८२०), मृत्यू- (२२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८९०)
  13. अहमदनगर: बाधित रुग्ण- (५०८), बरे झालेले रुग्ण- (३५७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३६)
  14. जळगाव: बाधित रुग्ण- (४०२६), बरे झालेले रुग्ण- (२२६३), मृत्यू- (२६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४९५)
  15. नंदूरबार: बाधित रुग्ण- (१९७), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०५)
  16. धुळे: बाधित रुग्ण- (१२३३), बरे झालेले रुग्ण- (६९२), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८१)
  17. औरंगाबाद: बाधित रुग्ण- (६२७१), बरे झालेले रुग्ण- (२७०३), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२८५)
  18. जालना: बाधित रुग्ण- (६८३), बरे झालेले रुग्ण- (३८०), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७९)
  19. बीड: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
  20. लातूर: बाधित रुग्ण- (४०४), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५९)
  21. परभणी: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
  22. हिंगोली: बाधित रुग्ण- (२८८), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)
  23. नांदेड: बाधित रुग्ण- (३८८), बरे झालेले रुग्ण (२४१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३३)
  24. उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२५३), बरे झालेले रुग्ण- (१८२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९)
  25. अमरावती: बाधित रुग्ण- (६३८), बरे झालेले रुग्ण- (४४६), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६२)
  26. अकोला: बाधित रुग्ण- (१६०९), बरे झालेले रुग्ण- (११८२), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४०)
  27. वाशिम: बाधित रुग्ण- (११६), बरे झालेले रुग्ण- (८१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
  28. बुलढाणा: बाधित रुग्ण- (२९८), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८)
  29. यवतमाळ: बाधित रुग्ण- (३२९), बरे झालेले रुग्ण- (२२७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९१)
  30. नागपूर: बाधित रुग्ण- (१६७२), बरे झालेले रुग्ण- (१२९२), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६५)
  31. वर्धा: बाधित रुग्ण- (१७), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)
  32. भंडारा: बाधित रुग्ण- (८९), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
  33. गोंदिया: बाधित रुग्ण- (१५९), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३)
  34. चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१०९), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)
  35. गडचिरोली: बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (५९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
  36. इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८६)

एकूण: बाधित रुग्ण - (२,००,०६४), बरे झालेले रुग्ण - (१,०८,०८२), मृत्यू - (८६७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (१६), ॲक्टीव्ह रुग्ण - (८३,२९७)

  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी