Weather Alert | राज्यात या जिल्ह्यांमध्ये पडणार अवकाळी पाऊस

पुणे
प्रशांत जाधव
Updated Apr 08, 2021 | 11:55 IST

Weather Alert | महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

Pune Meteorological Department rain alert few district of Maharashtra
Weather Alert | राज्यात या जिल्ह्यांतमध्ये पडणार अवकाळी पाऊस  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.
  • नागपूर वेधशाळेने 11 एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे
  • या सोबत काही भागत तापमान वाढणार आहे. अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 

पुणे : महाराष्ट्रात येत्या दोन दिवस राज्यात काही भागात मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुण्यासोबत मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात  हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  या सोबत काही भागत तापमान वाढणार आहे. अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 

महाराष्ट्रात कोणत्या भागात पाऊस ?

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसात हलक्या सरी बसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात आकाशात ढगांची गर्दी होईल आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तापमानदेखील वाढत आहे. पुणे वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवताना झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्राकार  स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या भागांमध्ये ढगाची गर्दीची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.

नागपूर वेधशाळेचा अंदाज 

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 11 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता

नागपूर वेधशाळेने 11 एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 9 ते 11 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात वाढलेल्या तापमानापासून मिळणार थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नागपूर वेधशाळेने हिट वेव्हचा अलर्ट हटवला आहे. 9 ते 11 एप्रिलच्या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याचा अंदाज आहे. 9 ते 11 एप्रिल च्या दरम्यान तापमानात घट होऊन विदर्भात ढगांच्या गडगडाट सह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. 9 तारखेला पूर्व विदर्भात तर 10 आणि 11 ला संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल ते कर्नाटक विविध राज्यांमध्ये पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्यानं पश्चिम बंगाल, कर्नाटक, सिक्कीम, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम या राज्यांमध्ये येत्या 24 तासांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. झारखंडमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी