पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातून (Pune district) एक अतिशय धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. आपल्या आईसोबत गेलेल्या 6 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक लोखंडी मशीन अंगावर कोसळून झालेल्या अपघातात या चिमकल्याचा मृत्यू (6 year old child died) झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळेगुरव परिसरात ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Incident caught in CCTV)
पिंपळे गुरव परिसरात एक महिला आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी नीता फॅब्रिकेशन शॉपमध्ये पोहोचली. यावेळी महिलेने आपल्या सहा वर्षीय मुलाला सुद्धा सोबत आणले होते. या महिलेची गाडी वॉशिंग सेंटरमध्ये धुण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नेली. त्यावेळी शेजारीच ही महिला एका बाकड्यावर बसली. तर त्या महिलेचा मुलगा तेथे खेळू लागला.
6 वर्षीय चिमुकल्यावर लोखंडी मशीन पडली; पिंपरी चिंचवडमधील घटना pic.twitter.com/VFEIv3v1Bo — Timesnowmarathi (@timesnowmarathi) July 6, 2022
त्यावेळी या मुलासोबत त्याची आई गप्पा मारत असल्याचं सुद्धा दिसत आहे. मात्र, त्याच दरम्यान मोठी दुर्घटना घडली. खेळता खेळता हा मुलगा एका स्टँडवर ठेवलेल्या लोखंडी मशीनच्या रॉडला लटकू लागला. मात्र, ही मशीन नटबोल्टने फिट केली नव्हती. त्यामुळे या चिमुकल्याच्या अंगावर ही मशीन पडली.
हे पण वाचा : शिंदे-फडणवीस सरकार येताच सिलेंडर महागला, बंडखोर आमदारांवरचा खर्च गॅस दरवाढीतून वसूल करणार?
मशीन आपल्या मुलाच्या अंगावर पडल्याचं महिलेच्या लक्षात येताच तिने धाव घेतली आणि ही मशीन त्याच्या अंगावरुन शेजारी केली. मात्र, ही मशीन लोखंडी आणि वजनदार होती त्यामुळे या मुलाला दुखापत झाली. सीसीटीव्हीत दिसत आहे की, ही महिला त्यानंतर तात्काळ मुलाला उचलून रुग्णालयात नेण्यासाठी धाव घेते.
या महिलेने आपल्या मुलाला उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केले. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलाची काळजी घेणं आणि तो खेळत असताना कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे.