Auto Rickshaw fare hike in Pune Pimpri Chinchwad: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरात रिक्षा भाड्यात वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईमुळे हैराण झालेल्या पुणेकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. रिक्षा भाडे वाढ करण्याचा निर्णय आज (२५ जुलै) झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. वाढत्या सीएनजीच्या दरामुळे रिक्षा चालकांनी हा निर्णय घेतला आहे. (Pune news auto rickshaw fare hike in pune city and pimpri chinchwad read new rates for transportation)
रिक्षा प्रवासात भाडे वाढ करण्यात आली असून ही भाडेवाढ १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्यानुसार आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी पुणेकरांना २३ रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हा दर दीड किलोमीटरसाठी २१ रुपये इतका होता. पण आता दोन रुपयांची वाढ करण्यात आल्याने पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपये भाडे द्यावे लागणार आहे.
अधिक वाचा : Shivsena : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, शिंदे गटावर केले आरोप
सीएनजीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या सीएनजीच्या दरामुळे रिक्षा भाड्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी रिक्षा चालकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार आज (२५ जुलै) रिक्षा संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत रिक्षा भाडे वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार आता १ ऑगस्टपासून नवी भाडेवाढ लागू होणार आहे. हा निर्णय पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला असून पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात भाडेवाढ लागू होणार आहे.
अधिक वाचा : शिंदे सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, पेट्रोलवर प्रतिलिटर ५ रुपये तर डिझेलवर ३ रुपयांची कर कपात
गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल, डिझेल सोबतच सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याच दरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करुन नागरिकांना काहीसा दिलासा दिला. मात्र, तरीही राज्यात पेट्रोलचा दर हा शंभरीपारच होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यावर नव्याने आलेल्या शिंदे सरकारने १४ जुलै रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ जुलै रोजी पत्रकार परिषद घेत म्हटलं, पेट्रोलवर प्रतिलिटर ५ रुपयांची कर कपात तर डिझेलवर प्रतिलिटर ३ रुपयांची कर कपात करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आणि थोडासा दिलासा नागरिकांना मिळाला आहे.