Pune School closed: शाळेभोवती तळे साचून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना मिळाली सुट्टी...

पुणे
सुनिल देसले
Updated Jul 13, 2022 | 16:38 IST

Pune School updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने पुण्यातील शाळांबाबात मनपाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Pune Pimpri chinchwad schools remain closed tomorrow july 14 due to heavy rainfall maharashtra rain updates
अतिवृष्टीचा इशारा; पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर 
  • मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता सुट्टी जाहीर 

पुणे : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडत आहे. पाऊस अधूनमधून थांबत असला तरी पावसाचा जोर हा कायम असल्याचं पहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील धरण साठ्यात वाढ झाली असून अनेक ठिकाणी पूरस्थिती (flood situation) निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. मुसळधा पाऊस पडत असतानाच हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हेच लक्षात घेता पुणे आणि पिंपरीतील शाळा उद्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Pimpri chinchwad schools remain closed tomorrow july 14 due to heavy rainfall)

पुणे महानगरपालिका आणि पिंपरी महानगरपालिकेकडून शाळा बंद ठेवण्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. पुणे मनपाच्या या आदेशात म्हटले, पुणे मनपा क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पुणे मनपा क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा, खाजगी शाळा, अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित अशा सर्व शाळांना 14 जुलै 2022 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

तर पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषंगाने शाळेत उपस्थित राहतील.

अशाच प्रकारे पिंपरी मनपाने ही सुट्टीबाबत पत्रक काढले असून त्यात म्हटले, पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळांना 13 जुलै 2022 ते 14 जुलै 2022 पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

लोणावळा धरण परिसरात सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत 71 मिमी पाऊस झाला आहे. जलाशयातील साठा सकाळी 10 वाजता 7.85 दलघमी (66.99%) इतका असून पुढील 24 ते 36 तासांत सांडव्यावरुन अनियंत्रीत स्वरुपाचा विसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये.

हे पण वाचा : रिपोर्टिंग करताना महिला पत्रकाराने मुलाच्या कानशिलात लगावली

खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग वाढवून दुपारी ३ वाजता १३ हजार १३८ क्युसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी